शनिवारपासून सुरू होणार, देशातील पहिली सीप्लेन सेवा ; पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन

Spread the love

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – प्रतिनिधी – दि. २६ ऑक्टो – नवीदिल्ली – देशातील पहिली सीप्लेन सेवा येत्या शनिवारपासून सुरू होण्याची शक्यता आहे. सर्व गोष्टी नियोजनानुसार पार पडल्या तर 31 ऑक्टोबरला गुजरातमध्ये पहिले सीप्लेन उड्डाण घेईल.साबरमती रिव्हरफ्रंट ते स्टॅच्यू ऑफ युनिटी या 205 किमीच्या अंतरावर ही सेवा नियमित सुरू राहील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सेवेचा शुभारंभ होईल, असे केंद्रीय मंत्री मनसुख मांडविय यांनी रविवारी सांगितले.

स्पाईस जेटने या सेवेसाठी मालदीवमधून एक सीप्लेन खरेदी केले आहे. ते सीप्लेन सोमवारी, 26 ऑक्टोबरला गुजरातमध्ये दाखल होत आहे. या सेवेबदल्यात स्पाईस जेटला उड्डाण योजनेचे लाभ दिले जातील. सीप्लेनमुळे पर्यटनाला चालना मिळेल.

देशासाठी ही एक नवीन सुरुवात असेल, असे मांडविय यांनी स्पष्ट केले. सरदार वल्लभभाई पटेल यांची 31 ऑक्टोबरला जयंती आहे. त्यामुळे याच दिवसाचा मुहूर्त साधून देशातील दळणवळणाच्या सेवांमध्ये सीप्लेनची भर घातली जाणार आहे.

या नव्या सेवेसाठी साबरमती रिव्हरफ्रंट आणि स्टॅच्यू ऑफ युनिटी या दोन्ही परिसरात फ्लोटींग जेटीसह पायाभूत सुविधा तयार ठेवल्या आहेत, असेही मांडविय यांनी नमूद केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *