महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. २८ ऑक्टो – राज्य सरकारच्या विनंतीनंतर न्यायालयात प्रॅक्टिस करणारे वकील आणि नोंदणीकृत क्लार्क यांना कामाच्या दिवशी लोकल मधून प्रवास करण्याची परवानगी अखेर सोमवारी देण्यात आली आहे. यासबंधीत मध्य आणि पश्चिम रेल्वेने संयुक्त माहिती दिली आहे.
कोरोनामुळे लॉकडाऊन काळात रेल्वे बंद करण्यात आली होती. त्यानंतर हळूहळू आता रेल्वे सेवा सुरू केली जात आहे. सुरुवातीला अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनंतर सरसकट महिलांना लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आली. तर सुरक्षा रक्षकांना सुद्धा परवानगी रेल्वेने दिली आहे. त्यानंतर आता, नोंदणीकृत वकिलांना लोकल प्रवास करता येणार असून, 23 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत लोकल प्रवास करण्याची मुभा आहे.
वकिलांच्या बार असोसिएशनने दिलेले ओळखपत्र दाखविल्यानंतरच रेल्वे तिकिट दिले जाणार आहे. यासाठी महाराष्ट्र आणि गोव्य़ाच्या बार असोसिएशन गृहीत धरल्या आहेत. तसेच क्लार्कसाठी मुंबई उच्च न्यायालायाची नोंदणी गृहीत धरल्या जाणार आहे.
वकिलांना प्रवासासाठी अटी
न्यायालयांमध्ये प्रॅक्टिस करणारे वकील आणि नोंदणीकृत क्लार्क यांना फक्त कामाच्या दिवशीच प्रवास करता येणार आहे. सकाळी 8 च्या आधी, सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत आणि संध्याकाळी 7 वाजल्यानंतर शेवटची लोकल सुरु असेपर्यंत या वकिलांना प्रवास करता येणार आहे.