शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) प्रवेशासाठी गुरुवार (ता. 29) पर्यंत मुदत

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. २८ ऑक्टो -पुणे – शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) 25 टक्के राखीव जागांवरील प्रवेशाच्या प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना येत्या गुरुवारपर्यंत (ता. 29) प्रवेश घेता येणार आहे. प्रवेश प्रक्रियेतील पहिली सोडत मार्चमध्ये काढण्यात आली. मात्र त्यानंतर कोरोनाचा संसर्ग वाढल्याने लॉकडाउन जाहीर झाला. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली. त्यानंतर ही प्रक्रिया काही महिन्यांपूर्वी पुन्हा सुरू करण्यात आली. त्यानुसार पहिल्या यादीतील विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया सप्टेंबरपर्यंत राबविण्यात आली. त्यानंतर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांसाठी प्रक्रिया राबविण्यात येत आहे. राज्यातील प्रतीक्षा यादीत 24 हजार 980 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. त्यातील आठ हजार 480 विद्यार्थ्यांचे प्रवेश आतापर्यंत निश्‍चित झाले आहेत. तर आठ हजार 176 विद्यार्थ्यांचे प्रोव्हिजनल प्रवेश झाले आहेत.

पालकांसाठी सूचना :
– रिक्त जागांनुसार पालकांना एसएमएसद्वारे प्रवेशाची तारीख कळविली जाईल
– पालकांनी आरटीई पोर्टलवर प्रवेशाची तारीख अर्ज क्रमांक टाकून पाहावे
– शाळेत प्रवेशासाठी पालकांनी गर्दी करू नये
– बालकांना शाळेत घेऊन जाऊ नये
– आवश्‍यक मूळ कागदपत्रे आणि कागदपत्रांच्या छायांकित प्रती घेऊन जावे
– पोर्टलवरुन हमीपत्र आणि अलॉटमेंट लेटरची प्रिंट काढून शाळेत घेऊन जावे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *