महाराष्ट्र 24 – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि.28 ऑक्टोबर- पिंपरी चिंचवड – महाराष्ट्र सरकारने ओबीसी समाजाच्या महत्वाच्या प्रलंबित मागण्या मान्य करण्यासाठी, आणि त्यासंदर्भात महाराष्ट्र शासनाला आपले म्हणणे मांडण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्री. श्रावण हर्डीकर साहेबांना आज अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद (पिंपरी-चिंचवड महानगर) च्या वतीने निवेदन दिले.* *या प्रसंगी महात्मा फुले समता परिषद (पिंपरी-चिंचवड महानगर) चे अध्यक्ष अॅड चंद्रशेखर भुजबळ व कार्यकारिणीचे पदाधिकारी श्री. ज्ञानेश्वर मोंढे (वरिष्ठ उपाध्यक्ष) श्री. पि.के. महाजन (वरिष्ठ उपाध्यक्ष) श्री. राजेंद्र करपे (सरचिटणीस) श्री. राजेंद्र फुले (अध्यक्ष-भोसरी विधानसभा) समतासैनिक श्री. प्रसाद कुदळे हे उपस्थित होते