Realmeचा हा फोन झाला 7 हजारांपेक्षा स्वस्त; जबरदस्त बॅटरी बॅकअप आणि दमदार फिचर्स

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. १ नोव्हेंबर : दिवाळी तोंडावर आली आहे. त्यामुळे आपण सगळेच सध्या शॉपिंगच्या मूडमध्ये आहोत. या दिवाळीत तुम्हाला स्मार्टफोन घ्यायचा असेल पण तुमचं बजेट कमी असेल तरीही चिंता करु नका. कारण अगदी 7 हजारांपेक्षा कमी किंमतीतही तुम्हाला स्मार्टफोन विकत घेता येणार आहेत. रिअलमी फेस्टिव्ह डेज (Realme Festive Days)चा रविवारी चौथा दिवस आहे. अजून 4 दिवस या सेलचा लाभ घेता येणार आहे.यंदा कनेक्ट फॉर रिअल दिवाळी (Connext For Real Diwali) अशी या सेलची टॅगलाईन ठेवण्यात आली आहे. या सेलमध्ये ग्राहकांना आकर्षक डिस्काऊंट देण्यात आला आहे. तुमचं बजेट कमी असेल तर ‘रिअलमी’चा C11 हा स्मार्टफोन तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे.

रिअलमी C11ची किंमत

तुम्ही 10 हजारांपेक्षा कमी किंमतीत उत्तम फिचर्स असलेला फोन शोधत असाल तर रिअलमी C11 तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे. या फोनची किंमत फक्त 7,499 रुपये आहे. पण या सेलमध्ये हाच फोन तुम्हाला 6,999 मध्ये मिळणार आहे.

रिअलमी C11 ची फिचर्स

रिअलमी C11च्या 2GB व्हेरिअंटमध्ये 32 मेमरी आहे. रियलमी C11 मध्ये 6.5 इंच एचडी (720×1600 पिक्सल) मिनीड्रॉप डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनचा स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 88.7% आहे. स्क्रीच्या प्रोटेक्शनसाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्रास 3चा वापर करण्यात आला आहे. या फोनमध्ये 2.3 गीगाहर्ट्ज़ ऑक्टा-कोर मीडियाटेक हीलियो G35 प्रोसेसर देण्यात आला आहे. रिअलमी C11 अँड्रॉईंड 10वर बेस्ड आहे.

काय आहेत कॅमेरा फिचर्स ?

रिअलमी C11ची किंमत कमी असूनदेखील यात चांगली कॅमेरा फिचर्स देण्यात आली आहेत. यात 13 मेगापिक्सल आणि 2 मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा अशी फिचर्स दिलेली आहेत. फोनमध्ये 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरादेखील मिळतो. C11ची बॅटरी 5000mAh आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *