महाराष्ट्र २४ ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. ५ नोव्हेंबर – केरळ –महाराष्ट्र पाठोपाठ केरळनेही केंद्रीय तपास यंत्रणा सीबीआयकडून थेट तपास करण्याची परवानगी काढून घेतली आहे. यापुढे सीबीआयला केरळमध्ये तपास करण्यापूर्वी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार आहे. 
केरळचे मुख्यमंत्री पिनरई विजयन यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. सीबीआय़ आपली मर्यादा ओलांडत असून राज्य सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे असाही आरोप पिनरई विजयन यांनी केला.केंद्र सरकारच्या यंत्रणा राज्याच्या धोरणांमध्ये हस्तक्षेप करत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.यापूर्वी पश्चिम बंगाल, राजस्थान, छत्तीसगड आणि महाराष्ट्राने असा निर्णय घेतलेला आहे.