स्टुडिओ प्रमाणेच थयथयाट करणाऱ्या अर्णब गोस्वामींना न्यायालयाने फटकारले

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. ५ नोव्हेंबर -रायगड – सत्र न्यायालयातही ‘रिपब्लिक’च्या स्टुडिओमध्ये हातवारे करत आरडाओरडा करणाऱ्या अर्णब गोस्वामीने आरडाओरडा सुरू केला. तो हातवारे करत पोलिसांवर आरोप करू लागला. त्याने थेट न्यायाधीशांसमोर येऊन पोलिसांनी बुट घालू दिले नाहीत, फक्त सॉक्सवरच कसे आणले असा थयथयाट केला. तेव्हा तुमचे हातवारे येथे चालणार नाहीत.. गपगुमान जाऊन पिंजऱ्यात उभे रहा, असे जबरदस्त फटकारे अर्णबला जिल्हा सत्र न्यायमूर्ती सुनयना पिंगळे यांनी लगावले. त्यानंतर अर्णब गोस्वामी खाली मान घालून आरोपीच्या पिंजऱ्यात येऊन उभे राहिले.

मुंबईतून अर्णब यांना उचलून अलिबागला आणण्याआधी पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक यांच्यासह एक उपविभागीय पोलीस अधिकारी, चार सहाय्यक पोलीस निरीक्षक, दहा पोलीस उपनिरीक्षक, 78 पोलीस कर्मचारी आणि माणगाव येथून एका प्लॅटूनला पाचारण करण्यात आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *