![]()
महाराष्ट्र 24 | विशेष प्रतिनिधी | दि. २६ जानेवारी |
मेष राशिभविष्य (Aries Horoscope)
कामानिमित्त घरापासून दूर राहावे लागेल. फसवणुकीपासून सावध राहावे. देणी द्यावी लागतील. एकाच गोष्टीचा फार वेळ विचार करू नका. खेळात मन रमवाल.
वृषभ राशिभविष्य (Taurus Horoscope)
व्यावसायिक आवक चांगली राहील. जुने मित्र भेटतील. मोठ्या भावाचे सहकार्य लाभेल. नवीन वाहन खरेदीचा विचार कराल. शेतीच्या कामात यश येईल.
मिथुन राशिभविष्य (Gemini Horoscope)
कामाचा विस्तार वाढवावा. कौतुकास पात्र व्हाल. शासकीय कामांकडे लक्ष द्यावे. पराक्रमाला वाव मिळेल. साहसाने कामे हाती घ्यावीत.
कर्क राशिभविष्य (Cancer Horoscope)
दूरच्या प्रवासाचा योग येईल. तुमची प्रतिमा उंचावेल. घरात किरकोळ बदल कराल. कामातील तांत्रिक बाबी जाणून घ्याव्यात. उताविळपणा करू नका.
सिंह राशिभविष्य (Leo Horoscope)
कामाचा ताण वाढू शकतो. हट्टीपणा बाजूला सारून विचार करावा. ध्येयाचा पाठपुरावा करावा. काही कामे वेळ काढतील. मागे हटू नका.
कन्या राशिभविष्य (Virgo Horoscope)
नैराश्य बाजूला सारून विचार करावा. काही वेळेस दोन पावुले मागे येणे उत्तम. खर्चाकडे लक्ष द्यावे. सर्व बाबी उघडपणे मांडू नका. झोपेची तक्रार जाणवेल.
तूळ राशिभविष्य (Libra Horoscope )
हाताखालील व्यक्तींची उत्तम साथ मिळेल. कामातून समाधान शोधाल. विरोधकांवर मात कराल. जबाबदार व्यक्तींची ओळख होईल. व्यावसायिक फायदा जाणून घ्यावा.
वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Horoscope)
मुलांच्या आनंदात सहभागी व्हाल. पैज जिंकता येईल. मैत्री अधिक घट्ट होईल. कामात अपेक्षित बदल कराल. काही गोष्टी सबुरीने घ्याव्यात.
धनू राशिभविष्य (Sagittarius Horoscope)
कौटुंबिक गोष्टीत अधिक रस घ्याल. घरातील कामात वेळ निघून जाईल. बागकामाची आवड पूर्ण कराल. वरिष्ठांची नाराजी ओढवून घेवू नका. वडिलधाऱ्यांच्या शब्दाला मान द्यावा.
मकर राशिभविष्य (Capricorn Horoscope)
मुलाखतीत यश येईल. मध्यस्थाचे काम कराल. आवडते साहित्य वाचाल. सहकुटुंब जवळची सहल काढाल. जोडीदाराची बौद्धिक बाजू लक्षात येईल.
कुंभ राशिभविष्य (Aquarius Horoscope )
कौटुंबिक बाबीत अधिक लक्ष घालावे. मुलांचे कौतुक कराल. चुकीच्या संगतीत अडकू नका. गोड पदार्थ चाखायला मिळतील. मतभेद दर्शवू नका.
मीन राशिभविष्य (Pisces Horoscope )
आरोग्यात सुधारणा होईल. कष्टाचे फळ मिळेल. कामातून समाधान लाभेल. हाताखालील लोकांचे सहकार्य लाभेल. चुगली करणाऱ्या लोकांपासून दूर राहावे.