महाराष्ट्र २४ ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. ५ नोव्हेंबर – मुंबई – भारतीय लष्काराच्या ताफ्यात आणखी तीन रफाल विमानं दाखल झाली आहेत. रफाल विमानांची दुसरी दुकडी भारतात दाखल झाली असून गुजरात येथील जामनगर एअरबेसवर ही विमानं उतरली.
भारताने आतपर्यंत एकूण 36 विमानं खरेदी केली आहेत. रफाल लढाऊ विमानांची पहिली तुकडी यापूर्वी पंजाबमधील अंबाला येथे दाखल झाली होती. फान्सकडून खरेदी केलेली रफाल विमानं टप्प्याटप्प्याने भारतात दाखल होत असून आतापर्यंत आठ विमानं पोहचली आहेत.हवाई दलाने दिलेले माहितीनुसार, प्रत्येक दोन महिन्यानंतर दोन ते तीन विमानं दिली जाणार आहेत.1997 मध्ये रशियाकडून सुखोई-30 हे विमान खरेदी केल्यानंतर आता 23 वर्षांनंतर हवाई दलात लढाऊ विमानं दाखल होत आहेत.