महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. ६ नोव्हेंबर – मुंबई : आगामी दिवाळी सण लक्षात घेता नागरिकांनी अधिक खबरदारी बाळगावी. मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टंसिंग पाळावे, हात सातत्याने धुत रहावे या उपाययोजनांचा अवलंब करण्याचे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले आहे.
फटाक्यांच्या धुरामुळे श्वसनाचा त्रास होतो त्यामुळे यावर्षी फटाकेमुक्त दिवाळी साजरे करण्याचे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. महाराष्ट्र फटाकेमुक्त करण्यासाठी मुख्यमंत्री व मंत्रिमंडळासमोर मागणी करणार असल्याचेही टोपे यांनी सांगितले.
दिवाळीत फटाक्यांच्या धुरामुळे श्वसनाला बाधा येऊ शकते. तसेच कोरोनात श्वसनाला त्रास होतो त्यामुळे यंदाची दिवाळी फटाकेमुक्त असावी अशी आरोग्य विभागाची भूमिका आहे. टास्क फोर्स बरोबर झालेल्या बैठकीत याबाबत चर्चा झाली आहे. दिवाळीनंतर थंडीत येणारी कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता असून राज्य सरकारने या दुस-या लाटेचा मुकाबला करण्यासाठी तयारी सुरू केली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यासंदर्भात टास्क फोर्स आणि डेथ ऑडीट कमिटीची बैठक घेतली.