महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. ८ नोव्हेंबर – मुंबई : महाविकास आघाडीचं सरकार म्हणजे चलती का नाम गाडी, थांबला तर खटारा, अशी टीका ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केली आहे. लोकपालनंतर लोकायुक्त कायद्यासाठी मी या सरकारमधील अनेक मंत्र्यांना पत्रं लिहिली मात्र, मुख्यमंत्री सोडता कुणाचेही उत्तर आले नसल्याचं अण्णा हजारे म्हणाले. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी एका वृत्तवाहिनी च्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांनी अशी टीका केली .
ठाकरे सरकार म्हणजे चलती का नाम गाडी, थांबला तर खटारा, अशा प्रकारचा कारभार चालला असल्याची टीका ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केली आहे. लोकपालनंतर लोकायुक्त कायदा तयार करायचा आहे. या कायद्याचा मसुदाही तयार करण्यात आला आहे. यासाठी मी राज्य सरकार मधील अनेक मंत्र्यांना पत्रं लिहिली. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोडता कोणाचेही उत्तर आले नाही. कोरोना परिस्थितीनंतर आपण पाहू असे, मुख्यमंत्र्यांनी उत्तर पाठवलं असल्याचे अण्णा म्हणाले. हा कायदा जर आणला नाही तर मी पुन्हा आंदोलन करणार असल्याचेही अण्णांनी सांगितले.