मोदी सरकारचा मोठा निर्णय; सर्व चारचाकी वाहनांसाठी १ जानेवारी २०२१ पासून ‘फास्ट टॅग’ अनिवार्य

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. ८ नोव्हेंबर – नवी दिल्ली – आता सर्व चारचाकी वाहनांसाठी १ जानेवारी २०२१ पासून ‘फास्ट टॅग’ मोदी सरकारने अनिवार्य केला आहे. या संदर्भातील एक परिपत्रक केंद्र सरकारच्या रस्ते परिवहन आणि राजमार्ग मंत्रालयाने काढले आहे. ज्यामध्ये सर्व चार चाकी वाहनांसाठी १ जानेवारी पासून ‘फास्ट टॅग’ अनिवार्य करण्यात आला आहे. जुन्या म्हणजेच ज्यांची विक्री १ डिसेंबर २०१७ च्या अगोदर झालेली आहे, अशा वाहनांसाह M व N कॅटेगिरीतील वाहनांना देखील हा नियम लागू असणार आहे.

केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ नुसार १ डिसेंबर २०१७ नंतर खरेदी करण्यात आलेल्या चारचाकी वाहनांच्या सर्व रजिस्ट्रेशनसाठी ‘फास्ट टॅग’ ला अनिवार्य केले गेले होते आणि ‘फास्ट टॅग’चा पुरवठा वाहन निर्माता किंवा डीलरद्वारे केला जात होता. याचबरोबर हे देखील अनिवार्य करण्यात आले होते की, फिटनेस प्रमाणपत्राचे रिन्युअल केवळ ट्रान्सपोर्ट वाहनांवर ‘फास्ट टॅग’ लावल्यानंतरच केले जाईल. १ ऑक्टोबर २०१९ पासून नॅशनल परमिट वाहनांसाठी ‘फास्ट टॅग’ लावणे बंधनकारक करण्यात आले होते.

मंत्रालयाचे असे म्हणणे की, मान्यताप्राप्त ‘फास्ट टॅग’ थर्ड पार्टी इंश्युरन्स घेताना देखील बंधनकारक असेल. हे इंश्युरन्स सर्टिफिकेटच्या पाहणीवरून होईल, ‘फास्ट टॅग’ चा आयडी डिटेल्स जिथे पाहिल्या जाईल. १ एप्रिल २०२१ पासून हा निर्णय लागू होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *