Google ची नवी पॉलिसी ; डेटा सेव्ह करण्यासाठी मोजावे लागणार पैसे

Spread the love

महाराष्ट्र २४- ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. १३ नोव्हेंबर – : गुगल (Google) आपल्या ग्राहकांना विविध सेवा मोफत देत असते. यामध्ये गुगल फोटो या सेवेचा देखील समावेश आहे. परंतु आता गुगलच्या ग्राहकांना गुगल फोटोची ही सेवा वापरण्यासाठी पैसे मोजावे लागणार आहेत. आतापर्यंत गुगल फोटो या अपवर फोटो आणि व्हिडीओ सेव्ह करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नसे. परंतु आता गुगलच्या नवीन पॉलिसीनुसार गुगल फोटो अपवर 15 GBपेक्षा अधिक डेटा अपलोड करायचा असल्यास तुम्हाला पैसा मोजावे लागणार आहेत. या प्रकारची पॉलिसी गुगलने GMail आणि गूगल ड्राइव्हसाठी आधीच लागू केली आहे. आज आम्ही तुम्हाला याच्याविषयी माहिती देणार आहोत. 15 GB पेक्षा अधिक डेटा अपलोड केल्यास किती चार्ज द्यावा लागेल आणि कधीपासून ही पॉलिसी लागू होणार आहे याची माहिती देणार आहोत.

1 जून 2021 पासून लागू होणार नवीन पॉलिसी:
गुगलने दिलेल्या माहितीनुसार, 1 जून 2021 पासून तुम्ही ‘गुगल फोटो’वर 15 GB पेक्षा अधिक डेटा अपलोड केल्यास पैसे मोजावे लागणार आहेत. त्याचबरोबर 1 जून 2021 आधी युजर्सनी कितीही डेटा अपलोड केला तर त्यासाठी पैसे आकारले जाणार नाहीत. त्यामुळे भविष्यात गरजेचे आणि महत्त्वाचेच फोटो सेव्ह करण्याचे आवाहन देखील गुगलने आपल्या युजर्सना केलं आहे.

गुगल फोटोवर आठवड्याला होतात 28 कोटी फोटो अपलोड :
गुगलने दिलेल्या माहितीनुसार गुगल फोटो या अपवर दर आठवड्याला 28 कोटी नवीन फोटो अपलोड होतात. नवीन पॉलिसी लागू केल्यानंतर 80 टक्के युजर्स 15 GBच्या आत फोटो सेव्ह करतील असा विश्वास देखील गुगलने व्यक्त केला आहे. खूप कमी ग्राहकांना गुगलचं हे गुगल फोटोचं सबस्क्रिप्शन घ्यावं लागेल. या नवीन सेवेमध्ये युजर्सची 15 GBची मर्यादा संपत आल्यास त्याला ईमेलच्या माध्यमातून संदेश पाठवला जाईल.

15 GB पेक्षा जास्त डेटावर कसा लागणार चार्ज:
या नवीन पॉलिसीनुसार 15 GB पर्यंत डेटा तुम्ही मोफत सेव्ह करू शकता. जर ग्राहकांनी ही 15 GBची मर्यादा ओलांडली तर त्यांना कमीतकमी 100 GB पर्यंत स्टोरेज घ्यावे लागेल. यासाठी प्रतिमहिना 130 रुपये आणि वर्षाला 1300 रुपये चार्ज आकारला जाईल. 200 GBपर्यंत स्टोरेज घेतल्यास महिन्याला 210 रुपये चार्ज द्यावा लागेल. तर 2TB आणि 10TB स्टोरेजसाठी महिन्याला अनुक्रमे 650 रुपये आणि 3,250 रुपये द्यावे लागतील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *