चेन्नई सुपर किंग्स आयपीएलच्या पुढील हंगामात हा खेळाडू होऊ शकतो कर्णधार

Spread the love

महाराष्ट्र २४- ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. १५ नोव्हेंबर -नुकत्याच पार पडलेल्या आयपीएलच्या हंगामात चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्र सिंह धोनीने आपण आयपीएलचा पुढील हंगाम खेळणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्याचबरोबर जरी आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली, असली तरी आयपीएलमधून निवृत्त होण्याचा कोणताही विचार नसल्याचे धोनीने सांगितले होते. पण धोनी पुढच्या मोसमात चेन्नईचे नेतृत्व सोडू शकतो, तसेच धोनीऐवजी चेन्नईचे नेतृत्व फाफ डुप्लेसिसकडे सोपवले जाऊ शकते, असे टीम इंडियाजे माजी फलंदाज प्रशिक्षक संजय बांगर यांना वाटत आहे. तसेच चेन्नईकडे डुप्लेसिसशिवाय दुसरा कोणताही पर्याय नसल्याचेही बांगर म्हणाले.

यंदाच्या आयपीएलमधली चेन्नईची कामगिरी अत्यंत निराशाजनक झाली. चेन्नईला आयपीएल इतिहासात पहिल्यांदाच प्ले-ऑफमध्ये प्रवेश करता आला नाही. चेन्नईची टीम पॉईंट्स टेबलमध्येही सातव्या क्रमांकावर राहिली, यानंतर धोनीच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित करण्यात आले.

संजय बांगर क्रिकेट कनेक्टेडशी बोलताना म्हणाले, धोनीने 2011 नंतर टीम इंडियाचे नेतृत्व सोडण्याचा विचार केला होता. पण त्याला माहिती होते की पुढे काही कठीण सामने खेळावे लागणार आहेत. भारताला इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जायचे आहे. कोणताही खेळाडू नेतृत्व त्यावेळी करण्यासाठी तयार नव्हता. योग्यवेळी धोनीने कर्णधारपद विराटकडे सोपवले आणि मग फक्त खेळाडू म्हणून तो टीममध्ये राहिला. सध्या चेन्नईकडे डुप्लेसिस शिवाय नेतृत्वासाठी कोणताही पर्याय नाही. तसेच अशा खेळाडूला दुसरी कोणतीही टीम सोडणार नाही, ज्यामध्ये चेन्नईचे नेतृत्व करण्याची क्षमता असेल, अशी प्रतिक्रिया संजय बांगर यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *