सोने झालं स्वस्त ; हा आहे आजचा कमॉडिटी बाजारातील दर

Spread the love

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. १८ नोव्हेंबर – मुंबई – सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये सलग दुसऱ्या सत्रात घसरण झाली आहे. मागणी कमी झाल्याने आज बुधवारी मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याचा भाव १८७ रुपयांनी कमी झाला आहे. चांदीमध्ये ३४५ रुपयांची घसरण झाली आहे.

आज बुधवारी मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये (MCX) सोन्याच्या दरात किंचित घसरण झाली आहे. सोन्याचा भाव प्रती १० ग्रॅम ५०५७५ रुपये आहे. त्यात १९१ रुपयांची घसरण झाली आहे. चांदीचा एक किलोचा भाव ६२८९० रुपये असून त्यात ३५८ रुपयांची घसरण झाली आहे. त्याआधीच्या सत्रात सोने ५६ रुपयांनी तर चांदी ३९३ रुपयांनी स्वस्त झाली होती.

सध्या कमॉडिटी बाजारात सोने आणि चांदीवर दबाव आहे. मागील आठवड्यात सोने-चांदीमध्ये नफावसुली झाली होती.
सोमवारी कमॉडिटी बाजारात संध्याकाळी ५ वाजता ट्रेडींग आयोजित करण्यात आले होते. त्यात सोने दरात ५८६ रुपयांची तर चांदीच्या भावात एक किलोला १०६२ रुपयांची घसरण झाली होती. मात्र बाजार बंद होताना सोने चांदी सावरले होते.

दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचा भाव प्रती १० ग्रॅम ५०११४ रुपये होता. तर चांदीचा भाव ४५१ रुपयांनी वधारून ६२०२३ रुपये झाला होता. रुपयाचे डॉलरसमोर अवमूल्यन आणि जागतिक बाजारातील चढ उतरांचे भारतीय बाजारावर पडसाद उमटले आहेत. जागतिक बाजारात सोन्याचा भाव प्रती औंस १८७७ डॉलर असून चांदीचा भाव २४.२० डॉलर आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *