सरकार ने निर्णय घेतला चीनमधील ‘या’ निकृष्ट इलेक्ट्रॉनिक वस्तूंची आयात थांबणार

Spread the love

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. २१ नोव्हेंबर – चीनमधून आयात होणाऱ्या सात निकृष्ट दर्जाच्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंची आयात रोखण्याचा निर्णय भारताने घेतला आहे. व्हिडिओ कॅमेरे, वेबकॅम, ब्लूटूथ स्पीकर्स, डिजिटल कॅमेरे, एलईडी डिमर, स्मार्ट स्पीकर्स आणि वायरलेस हेडसेटची आयात थांबवण्यासाठी भारताने ही उत्पादने अनिवार्य नोंदणी आदेशात ठेवली असून, लवकरच या आदेशाच्या अंमलबजावणीला सुरुवात होईल.

अनिवार्य नोंदणी आदेशातील तत्वांनुसार, सरकार केवळ मानके पूर्ण करणाऱ्या वस्तूंचीच आयात करण्यास परवानगी देते. आता यापुढे सात चिनी उत्पादनांना बीआयएस चाचणी करून परवाना घ्यावा लागणार आहे. त्यांनी भारतीय मानक ब्युरो प्रमाणित वस्तूंची मानके पूर्ण केल्यानंतरच त्या वस्तूंची आयात केली जाणार आहे.

भारत चीनकडून मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रॉनिक वस्तूंची आयात करतो. यामधील अनेक वस्तू निकृष्ट दर्जाच्या असल्याचे समोर आले. त्यामुळे या वस्तूंची आयात बंद करून स्वदेशी उत्पादनांना चालना देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *