कोरोना शरीरात इतके महिने राहू शकतो , डॉक्टरांचा खुलासा

Spread the love

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. २२ नोव्हेंबर -जगभरात कोरोनाचा कहर सुरुच आहे. युरोपमध्ये अनेक देशांमध्ये लॉकडाऊन करावा लागलाय. भारतामध्ये कोरोना पॉझिटीव्ह असलेल्यांची संख्या ९० लाखांच्यावर गेलीय. अशावेळी एक महत्वाची बातमी समोर आलीय. ‘द लांसेट माइक्रोब’ (The Lancet Microbe) मधील रिपोर्टनुसार कोरोना माणसांच्या शरीरात ८३ दिवसांपर्यंत राहतो.

३ महिन्यापर्यंत शरीरात कोरोना
कोरोना संक्रमण झाल्यानंतर तो शरीरात ९ दिवस राहतो असे आतापर्यंतच्या अभ्यानुसार सांगितले जात होते. विदेशात झालेल्या परीक्षणानुसार कोरोना शरीरात ३ महिने राहतो. ब्रिटन आणि इटलीच्या संशोधकांनी SARS-CoV-2 वर केंद्रीत एकूण ७९ परीक्षणांचे विश्लेषण केले. SARS-CoV-2 हे कोरोना प्रादुर्भावाचे मुख्य कारण आहे.

संशोधन करणारे सहलेखक आणि डॉक्टर एंटोनियो हो यांच्यानुसार रुग्णालयात भरती झालेल्यांवर हे संशोधन झाले. ज्यांच्यावर वायरसचा प्रभाव कमी होता त्यांच्यावर संशोधन करण्यात आले नाही. ज्यांच्यावर वायरसचा प्रभाव कमी असतो ते वेगाने यातून बाहेर पडतात असा निष्कर्ष देखील काढण्यात आलाय.

कोरोना संक्रमित झालेल्या व्यक्तीसाठी सुरुवातीचे ५ दिवस महत्वाचे असतात. त्यामुळे शक्य तितक्या लवकर त्याला आयसोलेट करणे महत्वाचे असते असे द लांसेट माइक्रोब (The Lancet Microbe) च्या रिपोर्टमध्ये म्हटलंय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *