महात्मा गांधींच्या घड्याळाचा लिलाव, तब्बल एवढ्या किमतीला …

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. २२ नोव्हेंबर – महात्मा गांधींच्या घड्याळाचा लिलाव करण्यात आला आहे. बोली लावणाऱ्याने हे घड्याळ तब्बल 12 हजार पाऊंड्सना खरेदी केले. म्हणजेच, भारतीय रुपयात याची किंमत जवळपास 12 लाखांपर्यंत गेली.हे घड्याळ मनगटावर घालण्याचं नव्हतं, तर खिशात ठेवण्याचं होतं. ते काही ठिकाणी तुटलंही होतं. मात्र, तरीही प्रचंड किंमत मोजून खरेदी केलं आहे.

इंग्लंडमधील ईस्ट ब्रिस्टॉल ऑक्शन्समध्ये शुक्रवारी (20 नोव्हेंबर) या घड्याळाची लिलाव प्रक्रिया पार पडली. हे घड्याळ अमेरिकेतल्या एका खासगी संग्रहकाने खरेदी केल्याची माहिती लिलाव करणारे अँड्र्यू स्टो यांनी दिली.महात्मा गांधींच्या या घड्याळाला चांदीचा मुलामा आहे. स्विस कंपनीचं हे घड्याळ आहे. स्वत: महात्मा गांधीजी यांनी 1944 साली हे घड्याळ एका व्यक्तीला दिले होते. या घड्याळाची मालकी त्या व्यक्तीच्या नातवाकडे होती.

यंदा ऑगस्ट महिन्यातच गांधींच्या चष्म्याचाही लिलाव ईस्ट ब्रिस्टॉल ऑक्शन्सनं केला होता. त्यावेळी चष्मा तब्बल 2 कोटी 55 लाख रुपयांना खरेदी करण्यात आला.

  • या घड्याळाचा इतिहास काय आहे?
    हे घड्याळ महात्मा गांधींचे अनुयायी असलेले कारपेंटर मोहनलाल शर्मा यांच्याकडे होते.1936 साली गांधी नागरी हक्कांसाठी लढणारे नेते आणि कार्यकर्ते यांना भेटण्यासाठी दौरे करत होते. त्यावेळी गांधींनीच हे घड्याळ 1944 साली त्यांना दिले होते. मग त्यांनी 1975 साली त्यांच्या नातवाकडे सुपूर्द केले.
    हे घड्याळ म्हणजे अहिंसेच्या इतिहासाचा तुकडा आहे आणि तो तुटलेला असला तरी ते त्याच्या आकर्षणात भर घालणारंच आहे, असं अँड्र्यू स्टो म्हणतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *