जगातील सर्वात खोल स्विमिंग पूल पर्यटकांसाठी झाला खुला

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. २८ नोव्हेंबर -पोलंडमध्ये जगातील सर्वात खोल स्विमिंग पूल बनवलेला आहे. आता हा ‘डीपस्पॉट’ नावाचा पूल पर्यटकांसाठी खुला करण्यात आला. त्याची खोली 45.5 मीटर म्हणजेच 150 फूट आहे. या पूलमध्ये अंडरवॉटर गुहाही बनवण्यात आल्या आहेत.

सर्वसाधारणपणे एखाद्या स्विमिंग पूलची खोली 25 मीटर असते. मात्र, हा पूल अतिशय खोल आहे. याठिकाणी हॉटेलप्रमाणे पर्यटकांना राहण्याचीही व्यवस्था आहे व खोलीतूनच त्यांना डायव्हिंग पाहता येऊ शकते. यापूर्वीचा सर्वात खोल स्विमिंग पूलचा विक्रम इटलीच्या मोंटेग्राटो पुलाच्या नावावर होता. हा पूल 42 मीटर खोल आहे. त्याचा विक्रम आता या पोलंडमधील पुलाने मोडला आहे. हा ‘डीपस्पॉट’ पूल पोलंडच्या सेंट्रल पॉलिश टाऊनमध्ये बनवण्यात आला आहे. याठिकाणी डायव्हर्सना प्रशिक्षणही दिले जाते. पुलाचे तापमान 32 ते 34 अंशांपर्यंत राहते. डायव्हिंग शिकण्यासाठी याठिकाणी अंडरवॉटर टनेल्स बनवण्यात आले आहेत. हा पूल तयार करण्यासाठी दोन वर्षांचा काळ लागला व 78 कोटी रुपये खर्च आला. या पूलमध्ये 8 हजार घनमीटर पाण्याची क्षमता आहे. तो ऑलिम्पिक साईजच्या 27 स्विमिंग पुलांच्या आकाराचा आहे. सध्या ब्रिटनमध्ये 164 फूट खोलीचा स्विमिंग पूल बनवला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *