इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना आता मातृभाषेतून शिक्षण घेता येणार

Spread the love

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. २८ नोव्हेंबर – इंजिनिअरिंगचं शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांसाठी खूषखबर आहे. आगामी शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांना मातृभाषेतही इंजिनिअरिंगचं शिक्षण घेता येणार आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने त्यातबाबत निर्णय घेतला आहे.

पुढील शैक्षणिक वर्षापासून (२०२१-२२) देशातील काही निवडक आयआयटी आणि एनआयटीमधून मातृभाषेतून शिक्षणाची सुरुवात करण्यात येणार आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरीयाल यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

”अभियांत्रिकी शिक्षणाबाबत पुढील शैक्षणिक वर्षापासून मातृभाषेत शिक्षण घेता येणार असून याबाबत देशातील निवडक आयआयटी आणि एनआयटी संस्थांची निवड करण्यात येणार आहे”, असं शिक्षण मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिका-यानं सांगितलं.

जेईईची परीक्षाही मातृभाषेत होणार – राष्ट्रीय शैक्षणिक संस्था (एनटीए) शालेय शिक्षण मंडळाच्या विद्यमान परिस्थितीचा आढावा घेऊन स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यासक्रम ठरवणार आहे. याशिवाय जेईईच्या परीक्षा इंग्रजी आणि हिंदी याव्यतिरिक्त आणखी ९ स्थानिक भाषांमधून घेण्यात येणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *