ड्रग्ज प्रकरणात अडकल्यामुळे कॉमेडियन भारती सिंहची ‘कपिल शर्मा शो’मधून हकालपट्टी?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. २९ नोव्हेंबर – शोमध्ये कोणत्याही वादग्रस्त व्यक्तींनी सहभागी नसावे, अशी चॅनेलची इच्छा आहे.कॉमेडियन भारती सिंह आणि तिचा नवरा हर्ष लिंबाचिया हे मागील काही दिवसांपासून ड्रग्ज प्रकरणामुळे चर्चेत आहेत. भारती आणि हर्ष यांनी ड्रग्जचे सेवन केल्याची कबुली एनसीबीकडे दिली आहे. त्यानंतर त्यांना अटकदेखील झाली होती. सध्या दोघेही जामीनावर बाहेर आहेत. या सर्व घटनेमुळे भारतीवर सर्व स्तरातूनआता टिका होऊ लागली आहे. यामुळे सोनी टीव्हीने आता भारतीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे. सूत्रांच्या माहितीनुसार ड्रग्ज प्रकरणात अडकल्यामुळे सोनी टीव्हीने भारतीची ‘द कपिल शर्मा शो’मधूनही हकालपट्टी केल्याचे कळते आहे. मात्र अद्याप चॅनेलकडून यासंदर्भात अधिकृत घोषणा झालेली नाही.

भारती कपिल शर्मा शोमध्ये दिसणार नसल्याचे समजते. मात्र चॅनेलचा हा निर्णय कपिलला मान्य नाही. सोनी टीव्हीने ‘द कपिल शर्मा शो’मध्ये भारतीवर बंदी घालू नये, असे कपिलचे म्हणणे आहे. कपिल शर्मा शो हा फॅमिली शो आहे. त्यामुळे या शोमध्ये कोणत्याही वादग्रस्त व्यक्तींनी सहभागी नसावे, अशी चॅनेलची इच्छा आहे.

सोनी टीव्हीने एखाद्या कलाकाराशी बंदी घालण्याची ही पहिली घटना नाही. यापूर्वी प्रसिद्ध संगीतकार अनु मलिकवर अनेक सेलिब्रिटींनी ‘मीटू’ आरोप केले तेव्हा सोनी टीव्हीने त्यांना चॅनेलमधून बाहेरचा मार्ग दाखवला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *