रेल्वेस्थानकावर पुन्हा मिळणार कुल्हडने चहा, रेल्वे मंत्री पीयूष गाेयल यांची घाेषणा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. ३० नोव्हेंबर – देशातील रेल्वेस्थानकावर आता पुन्हा कुल्हडने चहाचा आस्वाद घेण्याची संधी मिळणार आहे. रेल्वे विभागाने त्यास हिरवा कंदील दाखवला आहे. रेल्वेमंत्री पीयूष गाेयल यांनी रविवारी ही माहिती दिली. अलवर जिल्ह्यातील डिगवारा रेल्वे स्थानक येथे आयाेजित डिगवारा-बंडीकुई विद्युतीकरण प्रकल्प कार्यक्रमात ते बाेलत हाेते.

ते पुढे म्हणाले, प्लास्टिक फ्री-इंडियाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी रेल्वे देखील याेगदान देणार आहे. त्याचाच भाग म्हणून पर्यावरणपूरक कुल्हड उपलब्ध करून दिले जाणार आहेत. तसे पाहिल्यास सध्या देशातील सुमारे ४०० रेल्वेस्थानकामवर आजही कुल्हडने चहापान केला जाते. मात्र लवकरच देशातील सर्वच रेल्वेस्थानकांवर कुल्हड उपलब्ध हाेतील. कुल्हडमधील स्वादही निराळा असताे. पर्यावरणाचे संरक्षणही हाेते आणि त्याद्वारे लाेकांना राेजगार देखील मिळताे. माेदी सरकार सत्तेवर येण्यापूर्वी राजस्थानमधील रेल्वे विद्युतीकरण प्रकल्पांकडे दुर्लक्ष झाले हाेते. म्हणजे दिल्ली-मुंबई रेल्वे विद्युतीकरण झाले. त्याच्या ३० तीस वर्षांनंतर एकाही मार्गावर अशी व्यवस्था करण्यात आली नव्हती. त्याशिवाय गुंतवणुकीतही माेदी सरकार अग्रेसर आहे. २०१४-२०२० या दरम्यान झालेली रेल्वेसाठीची गुंतवणूक २००९-२०१४ च्या तुलनेत जास्त आहे. रविवारी गाेयल यांच्या हस्ते डिगवारा-बंदिकुइ या ३४ किमी लांबीच्या मार्गाचे विद्युतीकरण पार पडले. याप्रसंगी दाैसाचे खासदार जसकाैर मीणा यांच्यासह अनेक लाेकप्रतिनिधींची उपस्थिती हाेती.

३० पूल, ३७८ बाेगदे
माेदी सरकारच्या काळात रेल्वे पायाभूत विकासासाठी माेठा निधी खर्च करण्यात आला. त्यातून २०१४- २०२० या काळात ३० पूल व ३७८ बाेगदे उभारण्यात आले. आधीच्या सरकारने एक टर्ममध्ये चार पूल व ६५ बाेगदे बांधले हाेते, असे गाेयल यांनी सांगितले.रेल्वेच्या विद्युतीकरणामुळे पर्यावरणाचे देखील संरक्षण हाेणार आहे. म्हणूनच देशभरात निर्मिती विजेवर रेल्वे माेठ्या प्रमाणात धावू लागतील. त्यातून इंधन, पैसा व वेळेचा अपव्यय टळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *