आगामी तीन-चार महिन्यांत देशातील नागरिकांना मिळणार कोरोना प्रतिबंधक लस – डॉ. हर्षवर्धन

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. १ डिसेंबर – देशातील जनतेला पुढील वर्षाच्या पहिल्या तीन-चार महिन्यांत कोरोना प्रतिबंधक लसीचा पुरवठा होण्याची शक्यता असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली आहे. त्याचबरोबर टप्प्याटप्प्याने देशातील सर्व जनतेला ही लस पुरवली जाईल, असेही माध्यमांशी बोलताना त्यांनी स्पष्ट केले. डॉ. हर्षवर्धन म्हणाले, देशातील जनतेला पुढील वर्षाच्या पहिल्या तीन ते चार महिन्यांत लसीचा पुरवठा करण्यात आपण सक्षम असू. त्यानंतर २५ ते ३० कोटी जनतेला जुलै आणि ऑगस्टमध्ये लस पुरवण्याची योजना आम्ही आखली आहे.

दरम्यान, डॉ. हर्षवर्धन दिल्लीतील बुरारी येथील निरंकारी समागम मैदानावर आंदोलन करत असलेल्या शेकडो आंदोलकांना आवाहन करताना म्हणाले, माझी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की कोविडचे नियम त्यांनी लक्षात ठेवावेत तसेच त्यानुसार वर्तन करावे. तोंडाला मास्क लावणे आणि फिजिकल डिस्टंसिंगचे पालन करणे यामध्ये आवश्यक आहे. ही आपल्या आरोग्यासाठी महत्वाची बाब आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *