महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. १ डिसेंबर – आपल्या महाराष्ट्रात वारकरी सांप्रायाची प्राण असलेली काकडा आरती मोठ्या उस्ताहात व आनंदात मोठ्या प्रमाणावर साजरा होत असते,या ही वर्षी बोपखेल.पुणे येथे कार्तिक स्नान समारोप दिंडी,गावकरी भजनी मंडळे व ग्रामस्थ यांच्यावतीने सोशल डिस्टंसींग पाळुन मोठ्या उत्साहात व आनंदात पार पडली.
यावेळी ह भ प श्री विठ्ठल महाराज घुले यांचे सकाळी १०.३० ते १२.३० सुश्राव्य असे हरिकीर्तन झाले सांगता समारोप समारंभात श्रींची सजावट मुख्य आकर्षण ठरली, सुवर्ण महोत्सव वर्षानिमीत्त काकड आरती सोहळ्याचे व गेल्या आठ दशकांपासून या सेवेचे नित्य नियमाने आयोजन करण्यात येते,श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सांगता सोहळा देखील मोठ्या भक्तिमय वातावरणात आयोजित करण्यात आला होता. सांगता सोहळ्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या मंदिर प्रदक्षिणेत ज्ञानोबा-तुकारामाच्या जयघोषात संपूर्ण परिसर दुमदुमला त्यानंतर श्रींची महाआरती करण्यात आली व श्री शशीकांतभाऊ घुले यांच्या हस्ते महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले,टाळकरी मंडळी व प्रत्येक भावीक भक्तांनी मोलाची साथ दिली,व कार्यक्रमासाठी प्रत्येकाने अनमोल सहकार्य केले,परिसरातील माता भगिनींच्या हस्ते दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले.व श्री विठ्ठल रुक्मीणी पांडुरंगाला साकडे घालण्यात आले,जगावर जे महामारीचे संकट आले आहे ते लवकर दुर करुन सर्वांना सुखात आनंदात व ऐश्वर्यात ठेव,अशी प्रार्थना करण्यात आली.