विराटने टॉस जिंकला प्रथम फलंदाजीचा निर्णय ; व्हाईट वॉश टाळण्यासाठी टीम इंडिया मैदानात

Spread the love

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. २ डिसेंबर – ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये व्हाईट वॉश टाळण्यासाठी टीम इंडिया (India vs Australia) मैदानात उतरली आहे. तिसऱ्या वनडेमध्ये कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. या दौऱ्यात विराटने पहिल्यांदाच टॉस जिंकला आहे. याआधी झालेल्या दोन्ही सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचा कर्णधार एरॉन फिंच याने टॉस जिंकला होता.

या मॅचमध्ये टीम इंडियामध्ये चार बदल करण्यात आले आहेत. मयंक अग्रवालऐवजी शुभमन गिल, युझवेंद्र चहलऐवजी कुलदीप यादव, मोहम्मद शमीऐवजी टी नटराजन आणि नवदीप सैनीऐवजी शार्दुल ठाकूरला संधी देण्यात आली आहे. तर ऑस्ट्रेलियानेही टीममध्ये तीन बदल केले आहेत. कॅमरुन ग्रीन, सीन ऍबॉट आणि एश्टन एगर यांना संधी देण्यात आली आहे. मागच्या मॅचमध्ये डेव्हिड वॉर्नरला दुखापत झाल्यामुळे तो खेळणार नाही, तर पॅट कमिन्स आणि मिचेल स्टार्क यांना विश्रांती देण्यात आली आहे.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यातल्या पहिल्या वनडेमध्ये भारताचा 66 रनने तर दुसऱ्या वनडेमध्ये 51 रनने पराभव झाला होता. खराब बॉलिंगचा फटका टीम इंडियाला मोठ्या प्रमाणात बसला आहे.

भारतीय टीम

शिखर धवन, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, टी नटराजन

ऑस्ट्रेलियाची टीम

एरॉन फिंच, मार्नस लाबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, मॉइसेस हेनरिक्स, ऍलेक्स कारे, कॅमरुन ग्रीन, एश्टन एगर, सीन ऍबॉट, एडम झम्पा, जॉस हेजलवूड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *