रिझर्व्ह बँकेची 2 डिसेंबरपासून आढावा बैठक ; महागाई वाढीने व्याजदर राहू शकतात ‘जैसे थे’,

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. १ डिसेंबर – भारतीय रिझर्व्ह बँक(आरबीआय) २ डिसेंबरपासून पतधोरण आढावा सुरू करेल. या वेळी केंद्रीय बँक सलग तिसऱ्यांदा धोरणात्मक दर “जैसे थे’ ठेवण्याचा निर्णय घेऊ शकेल, असे मानले जात आहे. तज्ज्ञांनुसार, किरकोळ महागाई दरात बदल होणार नाही. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली सहासदस्यीय पतधोरण समितीची दोन दिवसांची बैठक होईल. निर्णयांची घोषणा ४ डिसेंबरला होईल.

एमपीसीच्या ऑक्टोबर २०२० मध्ये झालेल्या मागील बैठकीत धोरणात्मक दरांत बदल केला नव्हता. यामुळे महागाईत वाढ झाली, जिने अलीकडे ६ टक्क्यांची पातळी पार केली आहे. केअर रेटिंग्जचे मुख्य अर्थतज्ज्ञ मदन सबनवीस म्हणाले, महागाई अद्यापही खूप वर आहे. अशा स्थितीत रिझर्व्ह बँकेकडे धोरणात्मक दर जैसे थे ठेवण्याशिवाय कोणताही पर्याय नाही.

यामुळे व्याजदरांत बदल न होण्याचे संकेत
– सप्टेंबर २०२० मध्ये संपलेल्या चालू वित्त वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीतही जीडीपीचा वृद्धी दर नकारात्मक राहिला. यामुळे केंद्रीय बँक पतधोरणाचा कल नरम ठेवू शकते.
– ब्रिकवर्क रेटिंग्जचे मुख्य आर्थिक सल्लागार एम. गोविंदा राव म्हणाले, ग्राहक मूल्य निर्देशांक(सीपीआय) आधारित महागाई सध्या बरीच आहे.
– मनीबॉक्स फायनान्सचे अधिकारी दीपक अग्रवाल म्हणाले, खाद्य आणि मुख्य महागाई जास्त आहे.
– कोटक महिंद्रा बँक समूहाच्या शांती एकम्बरम म्हणाल्या, महागाई सतत रिझर्व्ह बँकेचे मध्यम अवधी लक्ष्य ४ टक्क्यांवर कायम आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *