टी20 मालिकेत ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवण्यासाठी टीम इंडिया सज्ज; युवा खेळाडूंची वर्णी लागणार?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. ४ डिसेंबर – ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या एकदिवसीय मालिकेनंतर आजपासून भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया अशा टी-20 मालिकेला सुरुवात होणार आहे. तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेचा पहिला सामना कॅनबरामध्ये खेळवण्यात येणार आहे. या मालिकेत भारतीय संघाचं लक्ष्य एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत झालेल्या पराभवाचा बदला घेण्यावर असले. एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाने अत्यंत निराशाजनक कामगिरी केली. दरम्यान, तिसऱ्या एकदिवसीय सामन्यांमध्ये झालेल्या बदलांमुळे भारतीय संघाने दमदार खेळी करत सामनाआपल्या खिशात घातला.

एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात ऑलराउंडर हार्दिक पांड्याने धमाकेदार खेळी केली. पांड्याने या सामन्यात 76 चेंडूंमध्ये नाबाद 92 धावांची खेळी केली होती. त्याव्यतिरिक्त रविंद्र जडेजाने नाबाद 66 आणि विराट कोहलीने 63 धावां केल्या होत्या. त्यामुळे पांड्याकडून टी-20 सीरिजमध्ये अशाच खेळीची आशा आहे. तसेच खालच्या फळीतील क्रमात जडेजा फलंदाजी करत संघासाठी आपलं योगदान देऊ शकतो.


या तरुण खेळाडूंना मिळू शकते प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा
कर्णधार विराट कोहलीकडे या सीरीजमध्ये काही गोलंदाज आणि फलंदाजांना प्लेइंग इलेव्हनमध्ये सहभागी करण्याची संधी आहे. गोलंदाजांमध्ये वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती आणि दीपक चाहर यांच्यापैकी एकाला प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा मिळू शकते. तसेच फलंदाजांमध्ये संजू सॅमसन किंवा मनीष पांडे यांना संघात जागा मिळू शकते. या सर्व खेळाडूंनी आयपीएल (IPL 2020) मध्ये उत्तम खेळी केली आगे. दरम्यान, रोहित शर्माची कमतरताही संघाला भासणार आहे.

टी-20 सीरीजसाठी भारतीय संघ
शिखर धवन, मयंक अग्रवाल, विराट कोहली (कर्णधार), केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, संजू सॅमसन, वाशिंगटन सुंदर, रविंद्र जडेजा, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, दीपक चाहर, वरुण चक्रवर्ती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *