मराठा आरक्षणाबाबत मोठी बातमी, अशोक चव्हाण यांची ट्विट करत दिली महत्त्वाची माहिती

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. ५ डिसेंबर – मराठा आरक्षणाबाबत महत्त्वाची माहिती मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली आहे. येत्या ९ डिसेंबर रोजी मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. पाच सदस्यीय घटनापीठापुढे ही महत्त्वाची सुनावणी होत आहे. मराठा आरक्षण प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेली अंतरिम स्थगिती हटविण्याबाबत राज्य शासनाने केलेल्या अर्जावर ९ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता ही सुनावणी होणार आहे.

मंत्रीमंडळाच्या मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी ट्विट करत ही महत्त्वाची माहिती दिली आहे. राज्य सरकारने यासाठी 4 वेळा सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींकडे अर्ज केला होता. त्यानंतर ही सुनावणी होत आहे.

अंतरिम स्थगितीनंतर राज्यातील मराठा समाज आक्रमक झाला होता. मराठा आंदोलकांच्या विरोधानंतर राज्य सरकारने एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली होती. त्यानंतर पोलीस मेगाभरतीसह तलाठीपदाच्या नियुक्त्या देखील रखडल्या आहेत. सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला स्थगित दिल्यामुळे मराठा समाज आक्रमक झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *