राज्यात थंडीची लाट; तापमानात आणखी घट होण्याची शक्यता

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. ७ डिसेंबर – हवामान खात्याच्या अंदाजानुसार दिल्लीत तापमानाचा आकडा 12 अंशांखाली उतरल्याचं निरिक्षात आढळून आलं. उत्तरेकडील कोरड्या आणि थंड वाऱ्यांमुळं जम्मू काश्मीर, himachal हिमाचल आणि uttarakhand उत्तराखंडमधील काही उंच प्रदेशांमध्ये बर्फवृष्टी होणार असल्याचा अंदाज आयएमडीनं वर्तवला आहे.

मागील काही दिवसांपासून सुरु झालेला हिवाळ्याचा ऋतू आता खऱ्या अर्थानं राज्यात आणि देशात स्थिरावू लागल्याचं चित्र आहे. उत्तर भारतात सातत्यानं तापमानाचा पारा खाली जात असून, दिल्लीपासून अगदी Jammu kashmir जम्मू काश्मीरपर्यंत याचे थेट परिणाम पाहायला मिळत आहेत.

दरम्यान, देशाच्या उत्तरेकडे आलेली ही थंडीची लाट राज्यावरही परिणाम करत असल्याचं पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात pune पुणे, nashik नाशिक, satara सातारा, nagpur नागपूर, kolhapur कोल्हापूर या भागांसह Mumbai मुंबईतही तापमानाचा आकडा खाली गेल्याचं पाहायला मिळालं. पुण्यात 11.5 अंश सेल्शिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली. तर, महाबळेश्वरमध्ये 14.3 अंश सेल्शिअस इतकं तापमान नोंदवलं गेलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *