महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. ११ डिसेंबर -कॉग्निझंट आखली आहे. लवकरच ही मोहीम हाती घेण्यात येणार असून येत्या वर्षात या नोकऱया उपलब्ध होण्याची शक्यता आहे. कंपनी सध्या सॉफ्टवेअर क्षेत्रात आपले स्थान आणखी बळकट करण्याच्या प्रयत्नात असून मोठा विस्तारही करण्याची तिची योजना असल्याचे सांगण्यात आले.
कोरोना लॉकडाऊनमुळे गेल्या सहा महिन्यांमध्ये कंपनीच्या कार्यांवर परिणाम झाला होता. तथापि, आता परिस्थिती बदलत असून सध्याचा काळ हा पुन्हा भरारी घेण्यासाठी सज्ज होण्याचा आहे, असे कंपनीचे नवे सीईओ राजेश नंबियार यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे कंपनी नव्या टॅलेंटच्या शोधात असून त्यासाठीच हा कँपस सिलेक्शनचा मार्ग निवडण्यात आला आहे, असेही स्पष्ट करण्यात आले.
उच्च वेतनाच्या नोकऱया
कॉग्निझंट देणार असणाऱया 23 हजार नोकऱयांपैकी बव्हंशी उच्चवेतनाच्या असतील असेही सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार समजते. त्यामुळे नवशिक्षित सॉफ्टवेअर अभियंत्यांसाठी ही मोठी संधी आहे. 2020-2021 या आर्थिक वर्षात कंपनीने 17 हजार नव्या नोकऱयांची निर्मिती केली आहे. यापैकी बहुतेक नोकऱया भारतीयांनाच मिळाल्या आहेत. 2021 मध्ये आणखी 23 हजार नोकऱया उपलब्ध होणार आहेत. एकंदर कंपनी विस्ताराच्या योजनेवर गांभीर्याने कार्यरत आहे.
जागतिक कंपनी
कॉग्निझंटही अनेक देशांमध्ये व्यवसाय विस्तार असणारी जागतिक कंपनी आहे. कोरोना काळात कंपनीने आपल्या कर्मचाऱयांचे आरोग्य आणि सुरक्षा यावर बरेच लक्ष दिले होते, असे सांगण्यात येते. तसेच प्रतिभावंत कर्मचाऱयांना विशेष बोनस देऊन त्यांना प्रोत्साहित करण्यासंबंधी कंपनीची ख्याती असल्याचेही सांगण्यात येते. 2020 मध्ये कोरोनामुळे आव्हानात्मक परिस्थिती असतानाही कंपनीने समाधानकारक बोनस दिला होता, अशी माहितीही सूत्रांनी दिली.
गुणवंतांना नोकऱयांची संधी…
कंपनीमध्ये प्रतिभावंत नवशिक्षितांना सुयोग्य संधी मिळणार
2020 मध्ये 17 हजार नोकऱया दिल्या, यावर्षी वाढ होणार
कोरोना काळात कंपनीचा कर्मचाऱयांच्या सुरक्षेवर होता भर