शेअर बाजार तेजीत: गुंतवणूकदारांनी केली ‘इतकी’ कमाई

Spread the love

महाराष्ट्र २४ :मुंबई :अमेरिका आणि इराणमधील तणाव काही प्रमाणात निवळल्याने गुंतवणूकदारांनी गुरुवारी चौफेर खरेदीचा सपाटा लावला. यामुळे मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ६३५ अंकांनी वधारून ४१ हजार ४५२ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजारात निफ्टीनेही १९० अंकांची कमाई करत १२ हजार २१५ अंकांचा स्तर गाठला. या तेजीने आठवड्याच्या सुरुवातीला ८०० अंकांच्या घसरणीत पोळून निघालेले गुंतवणूकदार सुखावले. कंपन्यांचे बाजार भांडवल वधारले आणि गुंतवणूकदारांच्या मालमतेत्त दोन लाख कोटींची भर पडली.

आज पाॅवर, टेक, वित्त सेवा, बांधकाम, इन्फ्रा, तेल आणि वायू, बँकेक्स, आॅटो या क्षेत्रात खरेदीचा ओघ आहे. निफ्टीवर स्माल कॅप आणि मिड कॅप शेअरची खरेदी वाढली आहे. सेन्सेक्स मंचावर ३० शेअरमध्ये इंडसइंड बँकेच्या शेअरमध्ये वाढ झाली. त्याशिवाय एसबीआय, आयसीआयसीआय बँक, भरती एअरटेल, इन्फोसिस, आयडीएफसी,टाटा मोटर्स, पीएनबी बँक, येस बँक, जिंदाल स्टील हे शेअर वधारले आहेत. जीएमआर इन्फ्रा, टीसीएस, एचसीएल टेक या शेअरमध्ये घसरण झाली. बुधवारी स्थानिक संस्थात्मक गुंतवणूकदारांनी ७४८ कोटींचे शेअर खरेदी केले. आशियातील प्रमुख शेअर बाजारात तेजी दिसून आली. अमेरिकन शेअर बाजारामंध्ये तेजी होती. जागतिक बाजारात खनिज तेलाचा भाव कमी झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *