महाराष्ट्र २४ : पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी सावित्रीबाई फुलें यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह्य विधानामुळे त्या काही दिवसांपासून अडचणीत आल्या होत्या. विविध पक्ष-संघटनांनी यावर आक्षेप घेत त्यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली होती. याबाबत ढोरे यांनी आज प्रसिद्धी पत्रक काढून कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करते असे या पत्रात नमूद केले.
३ जानेवारी रोजी सावित्री फुले जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना पिंपरी-चिंचवडच्या महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी ‘सावित्रीबाई इंग्रजांच्या घरी धुणीभांडी करत होत्या’ असे अक्षेपार्ह्य वक्तव्य केल्यामुळे गेल्या सहा दिवसांपासून त्यांच्यावर विविध माध्यमांतून टीका होत होती. त्यानंतर महात्मा फुले समता परिषद पिंपरी-चिंचवडचे उपाध्यक्ष पी. के. महाजन यांनी त्यांच्या या वक्तव्यावर आक्षेप घेत आंबेडकर चौकात गुरुवार दिनांक ९ रोजी धरणे आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. त्यामुळे अखेर गुरुवारी ढोरे यांनी प्रसिद्धी पत्रक काढून दिलगिरी व्यक्त केली आहे.