अमेरिका-इराण तणावाची तुमच्या खिशाला लागणार कात्री

Spread the love

महाराष्ट्र २४:-भारत हा अमेरिका आणि रशियाकडूनही तेल आयात करतो. परंतु भारताचं सर्वाधिक तेल आखाती देशांमधून येतं आणि त्यात इराक पहिल्या क्रमांकावर आहे. त्यापाठोपाठ सौदी अरेबिया, ओमान आणि कुवेत यांचा नंबर लागतो.तेलाच्या मार्गात अडथळ येईल याची भारताला चिंता नाही परंतु तेलाच्या किंमती वाढतील ही भारताची चिंता आहे. आता तेलाच्या किमती प्रतिबॅरल 3 डॉलरने वाढली आहे.तीन डॉलरनी किमती वाढणं भारतासाठी मोठी गोष्ट आहे. कारण भारतात जे पेट्रोल-डिझेल, LPG घेणारे लोक आहेत किंवा तेल विकत घेणाऱ्या कंपन्या आहेत ते यावर अवलंबून आहेत. त्यांच्यासाठी ही चांगली बातमी नाही अमेरिकेच्या या कारवाईचा परिणाम भारतीयांच्या खिशावर होणार आहे कारण येत्या काळात तेलाच्या आणि एलपीजीच्या किंमती नक्की वाढतील. भारतातले तेल मिळत राहिल पण किंमती वाढलेल्या असतील.सरकारसमोर आर्थिक नुकसान कमी करण्याचं आव्हान असतानाच तेलाच्या किंमती वाढत असल्यामुळे सरकारसमोर दुहेरी चिंता निर्माण झाली आहे. रुपयावरही याचा परिणाम होणार असं दिसत आहे.

अमेरिकेसारखे भारताकडे पर्याय नाहीत. सध्या अमेरिका दररोज 12 दशलक्ष बॅरल तेलाचं उत्पादन करतो. तसेच जगभरात अनेक ठिकाणी जाऊन तेलाचं खनन, आयात निर्यात करणाऱ्या सर्वांत मोठ्या कंपन्या अमेरिकेच्या मालकीच्या आहेत. जगभरातील तेलाचा व्यापार डॉलरमध्ये चालतो आणि त्यामुळेही अमेरिकेलाच फायदा होतो.दुसरीकडे भारत आपल्या एकूण तेलापैकी 85 टक्के तेलाची आयात करतो. भारतात तेलाच्या मागणीतही सतत वाढ होत आहे.प्रत्येक वर्षी ही मागणी 4 ते 5 टक्क्यांनी वाढत आहे. भारतात गाड्यांची संख्याही वाढत आहे.85 टक्के तेलाप्रमाणे एकूण नैसर्गिक वायूपैकी 50 टक्के गॅसही भारत आयात करतो. जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये इतक्या मोठ्य़ा प्रमाणात तेल आणि वायू आयात करण्यावर अवलंबून असणारा भारत हा एक देश आहे. चीनमध्ये हे प्रमाण 50 ट्कके इतके आहे.त्यामुळे मध्य-पूर्वेत कधीही अशीही स्थिती निर्माण झाली की भारतावर संकटाचे ढग जमा व्हायला सुरुवात होते. पर्यायी ऊर्जास्त्रोतांवर भारतानं म्हणावं तितका भर दिलेला नाही. आपण कोळसा, युरेनियमसुद्धा आयात करतो तसेच सौरऊर्जेसाठी लागणारी सामग्रीही आयात करतो.तेलाच्या किमती वाढल्यावर विकसनशील अर्थव्यवस्थांवर परिणाम होतो. रशियाचा विचार केला तर रशियाकडे स्वतःचं भरपूर तेल आहे. ब्राझीलकडेही स्वतःचं भरपूर तेल आहे. चीनकडे स्वतःचं तेल नसलं तरी जगभरातला मोठा तेलाचा साठा चीननं खरेदी केला आहे.जपाननेही तसंच केलं आहे आणि त्यांची अर्थव्यवस्था विकसित आहे. त्यामुळे असं काही संकट आलं की भारताला सर्वांत मोठा धोका असतो. अर्थव्यवस्थेचं तेलावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी भारतानं ऊर्जा नीती तयार केलेली नाही.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *