१ किलोचा एकच पेरू: विक्री जोरात

Spread the love

स्थानिक पेरूंबरोबर बाजारात बऱ्याच जाती आपल्याला पाहायला मिळतात. पण यातील एक पेरूची जात सध्या ग्राहकांना चांगलीच आकर्षित करत आहे. ती म्हणजे रायपूर जातीचा पेरू! या पेरुला हायब्रीड पेरू असे देखील म्हणतात. 

 महाराष्ट्र २४:-नवी मूंबई : थंडीचे दिवस सुरू झाले की बाजारात पेरू दिसायला सुरुवात होते. स्थानिक पेरूंबरोबर बाजारात बऱ्याच जाती आपल्याला पाहायला मिळतात. पण यातील एक पेरूची जात सध्या ग्राहकांना चांगलीच आकर्षित करत आहे. ती म्हणजे रायपूर जातीचा पेरू! या पेरुला हायब्रीड पेरू असे देखील म्हणतात. 

 

रायपूर जातीचा पेरू दिसायला मोठा असून, त्याचा एक-दीड किलोचा आकार पाहून लोकही अचंबित होत आहेत. कमीत-कमी एक किलो वजन… बिया कमी आणि जास्त गर,.. असा हा ग्राहकांना भुरळ पाडणारा पेरू आहे. एपीएमसीतील फळविक्रेत्यांकडे हा पेरू सध्या विक्रीला आहे. हा पेरू केवळ आकर्षणाचा भाग राहिला नाही; तर त्याची विक्रीही जोरात सुरू आहे.रायपूर पेरूची मुख्य जात ही थायलंडमधील असून, चार वर्षापूर्वी मध्य प्रदेशमध्ये या पेरूची लागवड होण्यास सुरुवात झाली. आता हळूहळू महाराष्ट्रातील पुणे, बारामती, कोल्हापूर, सातारा या ठिकाणी देखील या पेरूच्या बागा उभ्या राहिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *