‘म्हाडा’च्या ५६ सोसायटींना सेवाशुल्कावर सूट मिळणार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. १८ डिसेंबर -म्हाडा वसाहतीच्या ५६ गृहनिर्माण संस्थांना म्हाडाकडून वाढीव सेवाशुल्कावर सूट देण्यासाठी शासन सकारात्मक असून यासाठी गठीत केलेल्या समितीच्या अहवालानुसार तातडीने प्रस्ताव तयार करावा, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत.

म्हाडा वसाहतीच्या गृहनिर्माण संस्थांना सेवाशुल्कावर सूट देण्यासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. निवासी प्रयोजनासाठी प्रदान केलेल्या जमिनीच्या थकीत सेवाशुल्कात सवलत देण्यासाठी गठीत केलेल्या समितीच्या शिफारशीनुसार अभय योजना तयार करून लवकरात लवकर प्रस्ताव सादर करावा. तसेच भोगवटदार वर्ग -२ जमिनीचे वर्ग- १ मध्ये रूपांतर करण्याची स्थगिती उठवून कार्यवाही सुरू करण्यात यावी, असे निर्देश यावेळी देण्यात आले. बैठकीत स्वदेशी मिल कंपाऊंडमधील कामगारांच्या घरांबाबत व्यवस्थापनाशी चर्चा करण्याचे तसेच नेहरूनगर म्हाडा वसाहतीतील पोलिसांच्या सेवा निवासस्थानाच्या अनुषंगानेही चर्चा झाली.

मुंबईतील लीजवरील जमिनीवर असणा-या गृहनिर्माण संस्थांमधील मध्यमवर्गीयांना दिलासा देण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने क्लास २ च्या मालमत्ता क्लास १ मध्ये फ्री होल्ड करण्याचा निर्णय घेतला. त्याला आघाडी सरकारने नुकतीच स्थगिती दिली होती. आम्ही त्याला विरोध केला होता. आता मुख्यमंत्र्यांनी ही स्थगिती उठवली आहे. आम्ही या निर्णयाचे स्वागतच करतो. पण का स्थगिती दिली होती देव जाणे? स्थगिती उठवली ती महसूल खात्याला माहित आहेना? या सरकारमध्ये मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीनंतर फाइलवरचे शेरे बदलले जातात म्हणून विचारले, असे खोचक ट्विट करत भाजप आमदार आशिष शेलार यांनी प्रश्न विचारले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *