वाहतुकदारांना मोठा दिलासा; वैध कागदपत्रांच्या बंधनाची अट रद्द

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. १९ डिसेंबर – मुंबई – वाहन नादुरुस्त होऊन आर्थिक दृष्ट्या परवडत नसल्यास वाहन नोंदणी रद्द करणे आवश्यक आहे. मात्र, नोंदणी रद्द करतांना वैध वाहनाचे विमा, वायु प्रदुषण नियंत्रण, फिटनेस प्रमाणपत्र बंधनकारक आहे. मात्र आता अशा प्रमानपत्रांची बंधन राज्य परिवहन विभागाने रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे वाहतुकदारांना दिलासा मिळणार आहे. मात्र, अवैध कागदपत्र आणि नादूरुस्त वाहने रस्त्यावर चालवल्या कडक कायदेशीर कारवाईला वाहतुकदारांना सामोरे जावे लागणार आहे.

रिक्षा, टॅक्सी या वाहन नादुरुस्त असल्यास किंवा आर्थिक दृष्ट्या परवडत नसल्यास अशा वाहनांना वाहतुकदारांकडून मोटार वाहन कायद्यानुसार त्या वाहनांची नोंदणी रद्द करणे अनिवार्य आहे. त्यासाठी वाहतुकदारांना मुदती इन्शुरन्स, योग्यता प्रमाणपत्र फिटनेस, पीयूसी नूतनीकरण करूनच आरटीओ मध्ये सादर करायचे असते. त्यामुळे विमा, पीयूसी आणि पासिंग करण्याकरता वाहतुकदारांना प्रचंड त्रास आणि आर्थिक भुर्दंड सुद्धा लागतो त्यामुळे वाहनांची नोंदणीच रद्द केली जात नव्हती

मात्र, आता वाहनांचा नोंदणी दाखला वरील नूतनीकरण कागदपत्रांशिवाय रद्द नोंदणी रद्द करण्याची परवानगी परिवहन विभागाने दिल्याने रिक्षा, टॅक्सी वाहतुकदारांना त्याचा फायदा होणार असून, नादुरुस्त किंवा वापरात नसल्याची नोंदणी रद्दचे प्रमाण वाढवण्यास सुद्धा मदत होणार आहे. अशा वाहनांची नोंदणी रद्द करतांना वैध विमा प्रमाणपत्र, योग्यता प्रमाणपत्र व वायु प्रदुषण नियंत्रण प्रमाणपत्र सादर करण्याचा आग्रह धरण्यात येऊ नये अथवा त्यासाठी दंडाची शुल्काची आकारणी करण्यात येऊ नये. मात्र, मोटार वाहन कर, पर्यावरण कर, ई चलान इत्यादी थकीत कर वसूल करण्यात यावा असे आदेश राज्य परिवहन विभागाने दिले आहे.

अवैध कागदपत्र असलेल्या वाहनांवर कारवाई
वाहन नादुरुस्त किंवा विमा प्रमाणपत्र, योग्यता प्रमाणपत्र व वायु प्रदुषण नियंत्रण प्रमाणपत्रांची मर्यादा संपलेल्या कागदपत्रांसह वाहने रस्त्यांवर चालवताना आढळून आल्यास अशा वाहतुकदारांवर कडक कारवाईचे आदेश सुद्धा परिवहन उपायुक्त लक्ष्मन दराडे यांनी दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *