महामार्गावर बेभानपणे वाहने चालवल्यास ड्रायव्हिंग लायसन्स रद्द करण्याचा निर्णय गृह विभागाने घेतला

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. १९ डिसेंबर – मुंबई – मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर या वर्षात दर महिन्याला अपघातात सरासरी सहा जणांनी जीव गमावला, तर मुंबई-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर दर महिन्याला सरासरी 27 जणांनी प्राण गमावले आहेत. त्यामुळे या अपघातांना आळा घालण्यासाठी या महामार्गावरील बेशिस्त वाहनचालकांना उद्या शनिवारपासून लगाम घालण्यात येणार आहे. ओव्हरलोड, ओव्हरस्पीड आणि उलटय़ा दिशेने येणाऱया वाहनांवर गस्ती वाहने व मोबाईल पॅमेऱयांच्या मदतीने लक्ष ठेवण्यात येईल. बेभानपणे वाहन चालवताना पकडल्यास तीन वेळा सुधारण्याची संधी दिली जाईल. चौथ्यांदा पकडल्यास थेट ड्रायव्हिंग लायसन्स रद्द करण्याचा निर्णय गृह विभागाने घेतला आहे.

राज्यातल्या महामार्गावर अपघातांना आळा घालण्यासाठी गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी वाहतूक, महामार्ग पोलीस, कायदा व सुव्यवस्था विभाग, परिवहन आयुक्त, गृह सचिवांची संयुक्त बैठक आयोजित केली होती. राज्यातल्या प्रमुख महामार्गावर अवजड वाहनांसाठी डावीकडील मार्गिक राखून ठेवलेली असताना अनेक ट्रकचालक उजव्या बाजूच्या मार्गिकेवरून अवजड वाहने चालवतात. त्यामुळे वाहतूककाsंडी व अपघातांना आमंत्रण मिळते. अशा प्रकारे अवजड वाहने चालवणाऱया चालकांना आवर घालण्याचा निर्णय घेतला आहे. नियमांचे उल्लंघन करून वाहने चालवणाऱया वाहनचालकांना पकडल्या जाणाऱया वाहन चालकांना एकदा-दोनदा नव्हे, तर तीन वेळा समज दिली जाईल. चौथ्यांदा नियमांचे उल्लंघन करणाऱया वाहनचालकाचा परवाना तीन ते सहा महिन्यांसाठी निलंबित करा किंवा कायमस्वरूपी रद्द करण्याचे आदेश गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी या बैठकीत पोलिसांना दिले आहेत.

ही मोहीम राज्यातल्या सर्व महामार्गांवर महिनाभर राबवली जाईल. तीन आठवडय़ांनंतर मोहिमेचा आढावा घेतला जाईल. या मोहिमेमुळे अपघात कमी होऊन वाहनचालकांना शिस्त लागेल. वारंवार नियमांचे उल्लंघन करणाऱया वाहनचालकांचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याची तरतूद केंद्र सरकारच्या मोटार व्हेईकल अॅक्टमध्येच आहे.
– शंभुराज देसाई, गृह राज्यमंत्री

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *