कोरोनाकाळात सुरक्षित पर्यटन; गोव्याप्रमाणे उत्तर प्रदेशातील आग्र्यात आता पर्यटकांसाठी नवी सुविधा

Spread the love

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. २४ डिसेंबर – उत्तर प्रदेशातील आग्र्यात आता पर्यटकांना (Tourist) फिरण्यासाठी बाइक उपलब्ध होणार आहे. भारतीय रेल्वेने भाड्यावर बाइक ( Bike on Rent) देण्याच्या सुविधेची सुरुवात केली आहे. या सुविधेमुळे आता बाइकमधून फिरण्याची आवड असणाऱ्या पर्यटकांना ताजमहल पाहणे सोपे जाईल. याशिवाय कोरोनाच्या काळात अधिक सुरक्षितपणे प्रवास करणे यामुळे शक्य होईल.

भारतीय रेल्वे (Indian Railways) नुसार आग्र्यात Bike on Rent ची सुविधा सुरू झाली आहे. आता आग्रा फिरण्यासाठी पर्यटकांना चांगली सुविधा मिळेल. मिळालेल्या माहितीनुसार रेल्वेनी या सुविधेची सुरुवात आग्रा कँट रेल्वे स्टेशन (Agra Cantt Railway ) येथे झाली आहे. रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार NINFRIS policy अंतर्गत ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. येत्या काही दिवसात आणखी स्टेशनवरही सुरू करण्याची शक्यता आहेत. यामुळे अन्य ठिकाणी पर्यटकांना भाड्याने बाइक मिळणं शक्य होईल.

आग्रा कँट रेल्वे स्टेशनच्या बाहेर निघालण्यानंतर तुम्हाला Bike on Rent ची सुविधा मिळेल. जेथून तुम्ही तुम्हाला हवी ती बाइक काही तासांसाठी किंवा पूर्ण दिवसासाठी भाड्यावर घेऊन सहजपणे फिरू शकता. आग्रा कँट रेल्ले स्टेशनअंतर्गत या सुविधेचे व्यवस्थापन करणारे राज कुमार जैन यांनी सांगितलं की, तीन विभागात दुचाकीची सुविधा देण्यात आली आहे. यामध्ये स्कूटी, बाइक आणि बुलेट यांचा समावेश आहे.

किती असेल भाडं?

जर तुम्ही बाइक भाड्याने घेत असता तर तुम्हाला प्रति तास वा संपूर्ण दिवसानुसार भाडं द्यावं लागेल.

अख्खा दिवसाचं भाडं ; स्कूटी (Scooty)- 500 रुपये
बाइक (Bike)- 600 रुपये
बुलेट (Bullet)- 800 रुपये

प्रत्येक तासानुसार. ; स्कूटी (Scooty)- 40 रुपये
बाइक (Bike)- 50 रुपये
बुलेट (Bullet)- 70 रुपये

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *