भारतीय संघात वेगवेगळ्या खेळाडूंसाठी वेगवेगळे नियम; गावसकर भडकले

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. २४ डिसेंबर – भारतीय संघात वेगवेगळ्या खेळाडूंसाठी वेगवेगळे नियम आहेत, असा आरोप भारताचे माजी कर्णधार सुनिल गावसकर यांनी बीसीसीआयवर केला आहे. भारतीय संघातील फिरकी गोलंदाज आर. अश्विन आणि नटराजन यांच्यासारख्या खेळाडूंविराधात एकप्रकारे भेदभाव होतो. दर्जेदार गोलंदाजी असतानाही अश्निला संघात स्थान मिळवण्यासाठी प्रत्येकवेला कसरत करावी लागते. कारण संघात वेगवेगळ्य खेळाडूंसाठी वेगवेगळे नियम आहेत, असा आरोप गावसकरांनी केला आहे.

Sportstar या इंग्रंजी संकेतस्थळासाठी लिहिलेल्या कॉलममध्ये गावसकरांनी आपलं परखड मत मांडलं आहे. यामध्ये बीसीसीआय आणि विराट कोहली यांच्यावरही निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, बाप होणार आहे म्हणून विराट कोहलीला दौऱ्याच्या मध्येच सोडून जाण्याची परवानगी मिळते. मात्र, नटराजनला मिळत नाही. आयपीएलदरम्यान नटराजन वडील झाला आहे. त्याला अद्याप आपल्या मुलीचं तोंड पाहाता आलं नाही. त्याला भारतात परत जाण्याची परवानगी का दिली नाही? असा सवाल गावसकरांनी आपल्या कॉलममध्ये उपस्थित केला आहे.

गेल्या काही वर्षांपासून अश्विनला संघात स्थान मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. गोलंदाजी क्षमतेत काही कमी आहे म्हणून नाही, तर यासाठी की तो संघाच्या बैठकीमध्ये आपलं मत मांडतो. अश्निल वगळता इतर खेळाडू मात्र फक्त मान हलवतात. मग ते त्या गोष्टीशी सहमत असो किंवा नसो. त्यामुळेच अश्निला संघात स्थान मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतोय, असे गावसकर म्हणाले.

गावसकर पुढे म्हणाले, कसोटी क्रिकेटमध्ये ३५० पेक्षा जास्त विकेट घेणाऱ्या गोलंदाजाचं इतर देशात कौतुक होतं. मात्र भारतामध्ये असं काही नाही. अश्निनने ३५० पेक्षा जास्त विकेट घेताना ४ शतकेही झळकावली आहेत. हे विसरु नका. बॉर्डर-गावसकर चषकातील पहिल्या कसोटी सामन्यात अश्निनला विकेट घेण्यात अपयश आलं असतं तर दुसऱ्या सामन्यात त्याला आराम मिळाला असता. मात्र इतर काही खेळाडूंना फ्लॉफ झाल्यानंतरही वारंवार संधी मिळत राहते. कारण, इथं प्रत्येक खेळाडूसाठी वेगवेगळे नियम आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *