नवीन वर्षात 2021 मध्ये कार महागणार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. २४ डिसेंबर – वर्ष 2020 हे वाहन उद्योगासाठी अडचणीचे राहिले आहे. यामध्ये एप्रिल महिन्यात काही कंपन्यांची विक्री शुन्यावर राहिली होती. परंतु या काळातही कंपन्यांनी नेटाने परिस्थितीचा सामना केला आहे. काही प्रमाणात या क्षेत्राने पुन्हा नव्याने तेजी घेण्यास सुरुवात केली आहे. परंतु येत्या नवीन वर्षात 2021 मध्ये मात्र कार खरेदी करणाऱया ग्राहकांना अधिकची रक्कम मोजावी लागणार असल्याचे संकेत मिळत आहेत. वाहन क्षेत्रातील जवळपास सर्वच मोठय़ा कंपन्या आपल्या कारच्या किमती वाढवण्यावर विचार करत आहेत.

मारुती सुझुकीला कार बाजारातील लीडर म्हणून ओळखले जाते. ही कंपनी जानेवारीपासून वाहनांच्या किमती वाढवण्याची शक्यता आहे. होंडा कंपनीही किमती वाढविण्याची तयारी करत आहे. भारतामधील आपल्या सर्व मॉडेलच्या किमती वाढविण्याची योजना आखत असल्याचे सांगण्यात येते. महिंद्रा ऍण्ड महिंद्राकडून प्रवासी आणि पर्यटन दोन्ही गटामधील वाहनांच्या किमतीत वाढ करण्याचा निर्णय होणार असल्याची माहिती आहे. रेनो इंडिया 28 हजाररुपयापर्यंत किमती वाढविण्याच्या तयारीत आहे. ही रक्कम कंपनीच्या सर्व मॉडेलवर आकारण्याची घोषणा होण्याचा अंदाज आहे. किया मोर्ट्स फक्त सोनेट-सेल्टोस या कारच्या किमती वाढविणार आहे. यामध्ये कियाने भारतीय बाजारात विक्रीसह नफा कमाईचा पहिल्या वर्षी विक्रम नोंदवला आहे.

बीएमडब्लू या कंपनीच्या कार्सही महागणार आहेत. कारच्या वाढीव किमती 4 जानेवारीपासून अंमलात येणार असल्याचे संकेत आहेत. फोर्ड सर्व कार्सवर जानेवारीपासून जवळपास 35 हजार रुपयापर्यंत किमती वाढविणार असल्याची माहिती आहे. कंपनीने अंतर्गत वाढता खर्च लक्षात घेऊन किंमतीत वाढ केल्याचे म्हटले आहे. टाटा कंपनीच्या व्यावसायिक वाहनांच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. यासंदर्भात टाटा मोर्ट्सने माहिती दिली आहे. अंतर्गत वाढलेला खर्च भरून काढण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.इसुजु आपल्या कारच्या किमती 10 हजारपर्यंत वाढविणार आहे. व्यावसायिक पिकअप वाहनांच्या किमती जानेवारी 1 पासून वाढणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *