पंतप्रधान मोदी यांचा उद्या ‘शेतकरी संवाद’

Spread the love

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. २४ डिसेंबर – पंतप्रधान नरेंद्र मोदी 25 डिसेंबर रोजी देशातील शेतकऱयांशी संवाद साधणार आहेत. व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून होणाऱया कार्यक्रमात केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर उपस्थित राहणार आहेत. शेतकऱयांच्या कल्याणासाठी सरकारकडून घेण्यात आलेल्या विविध सुधारणांवर शेतकरी स्वतःचे अनुभव मांडणार आहेत. याचवेळी ते पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता जाहीर करणार असल्याची माहिती पंतप्रधान कार्यालयाने दिली आहे. पीएमओच्या म्हणण्यानुसार, पंतप्रधान नऊ कोटी लाभार्थी शेतकऱयांना 18 हजार कोटी रुपयांहून अधिक रक्कम पाठविण्यास परवानगी देतील. यावेळी 6 राज्यांतील शेतकऱयांशी संवाद साधणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *