महाराष्ट्र २४ जुन्नर : अनेक ठिकाणी ड्रोनचा वापर केला जातो. असाच एक ड्रोन सध्या जुन्नर तालुक्यातल्या शिरोली बुद्रुक परिसरात पाहायाला मिळतोय.या ड्रोनचं शेतामध्ये काय काम? तर या ड्रोनच्या मदतीनं शेतावर फवारणी केली जाणार आहे. जुन्नर तालुक्यातील शिरोली बुद्रुक परिसरात ड्रोनद्वारे शेतावर सुरू असलेल्या फवारणीची; एकच चर्चा रंगतेय. ही हायटेक फवारणी पाहण्यासाठी शेतकरीही गर्दी करत आहे. नाशिक इथल्या एका कंपनीनं हा प्रयोग हाती घेतला.
या ड्रोनची एका वेळी 10 लिटर फवारणीची क्षमता असून सर्वत्र एकसारखी फवारणी होते. या फवारणीसाठी शेतकऱ्यांना एकरी 800 रुपये मोजावे लागताय. शेतकऱ्यांना मजुरांनाही इतकेच पैसे द्यावे लागतात. मात्र, ड्रोनच्या फवारणीमुळे शेतकऱ्यांची वेळेचीही बचत होणार आहे. तसंच, मजुरांमुळे शेतातल्या नाजूक पीकांची होणारी नासधूसही ड्रोनच्या फवारणीमुळे थांबण्यास मदत होइल.अगदी काही मिनिटांत शेतावर ड्रोनने सहज फवारणी केली जाऊ शकते. तसंच, सूक्ष्म पद्धतीनं पीकावर सर्वत्र फवारणी होत असल्याने याचा चांगला फायदा होत असल्याचंही शेतकरी सांगत आहे. त्यामुळे भविष्यात तुम्हाला शेतात ड्रोन फिरताना दिसला तर नवल वाटायला नको.