राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना ईडीची नोटीस?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. २६ डिसेंबर – राष्ट्रवादी काँग्रेसेचे नेते एकनाथ खडसे यांना ईडीकडून नोटीस मिळाल्याची चर्चा असून त्यांना 30 डिसेंबर रोजी चौकशीला हजर राहावे लागणार असल्याचं म्हटलं आहे. पुण्यातील भोसरी एमआयडीसी भूखंड घोटाळ्याप्रकरणी खडसेंना नोटीस मिळाल्याची चर्चा रंगू लागली आहे. परंतु अशी कुठलीही नोटीस मिळाली नसल्याची प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी वृत्तवाहिनीला दिली.

एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम करुन ऑक्टोबर महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर उत्तर महाराष्ट्रातील खडसेंच्या काही सर्मथकांनीही भाजपमध्ये प्रवेश केला होता. पक्ष सोडताना त्यांनी ईडी लावली तर मी सीडी लावेन असंही खडसे यांनी सांगितलं. त्यामुळे एक ना एक दिवस आपल्याला ईडी ची नोटीस मिळेल अशी खडसे यांना कल्पना होती. पण पण सध्यातरी अशी कुठली नोटीस नसल्याचं खडसे सांगत आहेत.

खडसे यांनी जळगावातील भाईचंद हिराचंद रायसोनी सहकारी बँकेतील घोटाळा उघडकीस आणण्याच्या हालचाली सुरु केल्या होत्या. यामध्ये भाजप आमदार गिरीश महाजन यांच्यासह भाजपच्या अनेक बड्या नेत्यांचा समावेश असल्याची चर्चा होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *