महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. २९ डिसेंबर – शेतीच्या कामासाठी उपयुक्त ठरणाऱया ट्रक्टर विक्रीत यंदा चांगलीच वाढ दिसली आहे. यंदा मान्सूनही समाधानकारक झाल्याने पिकांचे उत्पादन चांगले आले आहे. या एकंदर काळात सोनालिका ट्रक्टरने आपला पहिला वहिला इलेक्ट्रीक ट्रक्टर बाजारात नुकताच लाँच केला आहे. ज्याची किंमत 5.99 लाख रुपये इतकी असणार असल्याचे सांगण्यात येते. ट्रक्टर खरेदीकरीता बुकिंगला सुरूवात झाली आहे.
टायगर नावाने सादर केलेला इ-ट्रक्टर 25.5 किलोवॅट बॅटरीवर चालतो. डिझेलच्या तुलनेत याचा वापर किफायतशीर ठरतो. कंपनीने सदर ट्रक्टरची किमत 5.99 लाख रुपये ठेवली असून या टॅक्टरच्या बुकिंगलाही सुरूवात झाली आहे. सदरचा ट्रक्टर प्रति तासाला 24 किलोमीटर वेगाने धावू शकतो. दोन टन ट्रॉलीसह हा ट्रक्टर 8 तास बॅटरी बॅकपसह चालवता येतो. सदरचा ट्रक्टर चार्ज करण्यासाठी 4 तासांचा अवधी लागतो. शेतकऱयांसाठी इलेक्ट्रीक टॅक्टर खूप उपयोगी ठरतो. टायगर इलेक्ट्रीक ट्रक्टर जागतिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने तयार करण्यात आला आहे. सदरचा ट्रक्टर घरीच 3 पीन 15 ऍम्पीयर सॉकेटवर चार्ज करता येणार आहे. हा ट्रक्टर महत्त्वाचे म्हणजे आवाज करत नाही. इतर टॅक्टर मात्र आवाज खूप करतात. ध्वनी प्रदुषण तसेच वायु प्रदुषण आता इलेक्ट्रीक ट्रक्टरमुळे कमी होणार आहे. त्यामुळे हा ट्रक्टर पर्यावरणाला पुरक ठरतो. म्हणजे पर्यावरणाचे हा ट्रक्टर नुकसान करत नाही.