उद्यापासून काही स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सअॅप वापरता येणार नाही

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. ३१ डिसेंबर – अॅपलच्या आयओएस ९ आणि अँड्रॉइडची ४.०.३ ऑपरेटिंग सिस्टिम असलेल्या मोबाइल फोनवर येत्या १ जानेवारीपासून जगातील सर्वात लोकप्रिय मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप चालणार नाही.

त्यामुळे आयफोन ४ किंवा त्याआधीच्या मॉडेलमध्ये व्हॉट्सअॅप वापरता येणार नाही. अशाच प्रकारे ४.०.३ अँड्रॉइड व्हर्जनच्या एचटीसी डिझायर, एलजी ऑप्टिमस ब्लॅक, मोटोरोला ड्रॉइड रेझर आणि सॅमसंग गॅलक्सी एस २ वर हे व्हॉट्सअॅप चालू शकणार नाही. तथापि, या मॉडेलचे व्हर्जन अपडेट केलेले असेल तर व्हॉट्सअॅप वापरता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *