नवीन वर्षात महिलांसाठी राज्य सरकारकडून एक चांगली बातमी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. १ जानेवारी – नव्या वर्षात महिलांसाठी राज्य सरकारकडून एक चांगली बातमी आहे. संकटग्रस्त महिलांना तातडीने मदत पुरवण्यासाठी सुरू केलेल्या 181 हेल्पलाइन नव्या वर्षात पुन्हा स्वतंत्रपणे महिलांसाठीच राखीव ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यातील महिलांना आता चोवीस तास मदतीचा हात मिळणार आहे. महिला आणि बाल विकास विभागाने ऑगस्ट 2014 मध्ये 181 हेल्पलाइन सुरू केली असून हेल्पलाइनचे कॉल सेंटर मुंबईत आहे.

नव्या वर्षापासून काही नियमांत बदल होणार आहे. याचा परिणाम तुम्हाला दैनंदिन आयुष्यात जाणवायला लागेल.

ओव्हरटाईम
8 तासांपेक्षा अधिक वेळ काम करणाऱ्यांना ओव्हरटाईम द्याला लागणार आहे. डेली वर्क ऑवर्स 8 तास ठेवण्यावर विचार केला जात आहे. याला मंजुरी मिळाल्यास ओव्हरटाईम सुरु होईल आणि 8 तासांची ड्युटी करण्यात येईल.

चेकचा व्यवहार
चेकचा व्यवहार करण्यांसाठी महत्वाची बातमी आहे. १ जानेवारीपासून चेकने पैसे देण्याच्या नियमात बदल होईल. चेकचा व्यवहार ५० हजार रुपयांहून अधिक असेल तर पॉझिटिव्ह पेमेंट सीस्टिम लागू होणार आहे. दोन्ही पार्टीकडून याची खात्री केली जाईल. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून हे बदल करण्यात आलेयत.

युपीआय सुरक्षित
गूगल पे, फोन पे सारखे यूपीआय वापरणाऱ्यांची संख्या पाहता ही यंत्रणा देखील अधिक सुरक्षित केली जाणार आहे. थर्ड पार्टी ॲपच्या यूपीआय पेमेंट सर्व्हिसवर ३० टक्क्यांपर्यंत मर्यादा लावण्यात येणार आहे. एनपीसीआयने हा निर्णय घेतलाय.

काँटॅक्टलेस कार्ड
रिझर्व्ह बँकेने काँटॅक्टलेस कार्डमधून होणाऱ्या व्यवहाराच्या मर्यादेत ५ हजारांपर्यंत वाढ केली. आरबीआयने डिजिटल पेमेंट पद्धतीला प्रोत्साहन देण्यासाठी हे महत्वाचे पाऊल उचललंय. सध्या ही मर्यादा २ हजार एवढीच असून ती ५ हजारांपर्यंत वाढवण्यात आलीय.

शून्य दाबून कॉल
आतापर्यंत आपण फोन लावण्यासाठी 91 हे बटण दाबत होतो. पण उद्यापासून कॉल करण्याआधी 0 बटण दाबाव लागणार आहे. वाढत्या नंबरची संख्या पाहता या निर्णयामुळे टेलिकॉम कंपन्यांना क्रमांक देखील वाढवता येतील.

फास्टॅग
नव्या वर्षापासून सर्व गाड्यांना फास्टॅग अनिवार्य असणार आहे. काही अपवाद वगळता विना फास्टॅग गाडी टोलनाक्यावरुन सोडण्यात येणार नाहीय. असे झाल्यास दंड आकारण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *