विद्यार्थ्यांसाठी नववर्षात “स्वाध्याय’चा उपक्रम ! शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड ; राज्यमंत्री बच्चू कडू

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. १ जानेवारी – राज्यातील पहिली ते सातवीपर्यंतच्या सर्वच आणि आठवी ते बारावीपर्यंतच्या बहुतांश शाळा आता बंद आहेत. या पार्श्‍वभूमीवर शालेय शिक्षण विभागातर्फे पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी “स्वाध्याय’ SWADHYAY (Student WhatsApp based Digital Home Assessment Yojana) या योजनेचे उर्दू माध्यमाचे उद्‌घाटन आज (शुक्रवारी) सकाळी 11 वाजता शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते मुंबईत केले जाणार आहे. या योजनेसाठी राज्यमंत्री बच्चू ऊर्फ ओमप्रकाश कडू यांचेही मार्गदर्शन लाभले आहे.

योजनेच्या उद्‌घाटनप्रसंगी अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, शालेय शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, महाराष्ट्र राज्य प्रकल्प संचालक तथा संचालक राहुल द्विवेदी यांच्यासह सर्व शिक्षण संचालक, विभागीय शिक्षण उपसंचालक, प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, शिक्षणाधिकारी व विभागाचे सर्व वरिष्ठ अधिकारी, सर्व शिक्षक, विद्यार्थी व पालक हे ऑनलाइन उपस्थित राहणार आहेत.

यावरून पाहता येणार थेट प्रक्षेपण
https://youtu.be/UNpEvZl7RIw येथे पाहता येईल. याच वेळी विद्यार्थ्यांना सदर योजनेचा लाभ कसा घ्यायचा, शालेय शिक्षण विभाग यांचा नववर्ष संदेश देखील दिला जाणार आहे. दरम्यान, प्राचार्य व मुख्याध्यापक यांनी या सुविधेबाबत विद्यार्थ्यांना अवगत करावे व सर्व विद्यार्थ्यांना हा कार्यक्रम यू – ट्यूबवर पाहता येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *