महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. १ जानेवारी – “शहरांची नावं बदलून विकासाचे प्रश्न सुटत नाहीत. काँग्रेस पक्षाचा भर जनतेचे प्रश्न सोडवण्यावर, विकासाची काम करण्यावर आहे,” अशी भूमिका मांडत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महाराष्ट्राचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी औरंगाबाद जिल्ह्याच्या नामांतराला विरोध केला.
बाळासाहेब थोरात पुढे म्हणाले, “औरंगाबादचे नाव बदलण्याचा विषय आमच्याकडे चर्चेसाठी आलेला नाही. ज्यावेळी समन्वय समितीमध्ये हा विषय चर्चेला येईल त्यावर काँग्रेस भूमिका मांडेल परंतु नाव बदलण्यास काँग्रेस पक्षाचा ठाम विरोध आहे.”
आज औरंगाबाद दौऱ्यावर आहे. या जिल्ह्याशी माझे विशेष नाते आहे. येथील तरुण, ज्येष्ठ कार्यकर्ते व नेते यांच्याशी संवाद साधायला मला कायमच आनंद होतो. आज मी शहरातील काही प्रमुख नेत्यांशी वैयक्तिक संवाद साधला. संघटनात्मक बाबींवर चर्चा केली. pic.twitter.com/3tMg02nCCg
— Balasaheb Thorat (@bb_thorat) December 31, 2020
औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर थोरातांनी पक्षाच्या तयारीचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते”राज्यात तीन पक्षाचे सरकार हे भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आले आहे. हे सरकार किमान समान कार्यक्रमावर चालते. यात शहरांची नावं बदलण्याचा मुद्दा नाही,” असं थोरातांनी सांगितलं.तसंच, औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्ष ताकदीने उतरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.