‘मारुती सुझुकी’ने विक्री वाढवण्यासाठी नवीन योजना आणली

Spread the love
महाराष्ट्र २४ – नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी कार उत्पादक ‘मारुती सुझुकी’ने विक्री वाढवण्यासाठी नवीन योजना आणली आहे. या योजनेत कंपनी कार खरेदीसाठीचे डाऊन पेमेंट ५० टक्क्याने कमी करणार आहे. त्यामुळे ग्राहकाला कार घेणे सहज शक्य होणार आहे. सध्या काही शहरांमध्ये ‘मारुती’कडून ही योजना प्रायोगिक तत्वावर राबवली जात आहे.
मंदीमुळे देशात मोटार विक्रीला घरघर लागली आहे. विक्री वाढवण्यासाठी सर्वच कंपन्या नवनव्या शक्कल लढवत आहेत. ‘मारुती सुझुकी’नेही एक नवी योजना तयार केली आहे. ज्यात ग्राहकाला सध्याच्या डाऊन पेमेंटच्या तुलनेत निम्मे डाउनपेमेंट भरून गाडी खरेदी करता येईल. या योजनेसाठी कंपनी बँकांसोबत करार करणार आहे. अनेकदा डाऊन पेमेंट जास्त असल्याने ग्राहक कार खरेदीचा निर्णय पुढे ढकतात.
डाउन पेमेंटचा भार ५० टक्के कमी होणार
सध्या ग्राहकांना गाडी खरेदी करताना कारची ऑनरोड किंमत जी असेल तिच्या २० टक्के रक्कम डाऊन पेमेंट म्हणून द्यावी लागते. मारुतीच्या नव्या योजनेनुसार ग्राहकांना कारच्या ऑनरोड किमतीच्या १० टक्के रक्कम डाऊन पेमेंट करता येईल. मारुतीची एखादी एन्ट्री लेव्हल कार ४.५ लाख रुपये असेल तर सध्या ग्राहकाला त्याच्या २० टक्के रक्कम म्हणजेच ८० ते ९० हजार डाऊन पेमेंट करावे लागते. नव्या योजनेत ग्राहकाला १० टक्के रक्कम म्हणजे ४० ते ४५ हजार रुपये डाऊन पेमेंट करता येईल.
‘मारुती’ची हायब्रीड कार यंदा बाजारात
मारुती २०२० मध्ये अनेक नव्या कार बाजारात दाखल करणार आहे. पुढील महिन्यात दिल्लीत होणाऱ्या ऑटो एक्स्पोमध्ये मारुती S- Cross पेट्रोलमध्ये सादर करेल. त्याशिवाय S- Cross हायब्रीड तंत्रज्ञानासह १.५ लीटर इंजिनमध्ये सादर केली जाणार आहे. १.५ लीटर इंजिन, ४ सिलिंडर इंजिन, १०३ bhp क्षमता अशी अनेक वैशिष्ट्ये असलेल्या मारुती S- Cross हायब्रीडचा मायलेज दमदार असेल, असा दावा कंपनीने केला आहे. या कारमध्ये इंजिन ५ स्पीड आणि ४ स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स असेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *