‘मी पुन्हा येईन’, अशी फडणवीस यांनी घोषणा करताच सभागृहात टाळ्या आणि शिट्या वाजल्या….

Spread the love

महाराष्ट्र २४-पिंपरी चिंचवड,11 जानेवारी: पिंपरी चिंचवडमध्ये ‘मोरया युथ फेस्टिव्हल’ला जोरदार सुरुवात झाली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ह्यांच्या हस्ते शनिवारी ‘मोरया युथ फेस्टिव्हल’चे उद्घाटन झाले. यावेळी प्रसिद्ध मुलाखतकार राहुल सोलापूरकर आणि सचिन पटवर्धन यांनी देवेंद्र फडणवीस यांची प्रकट मुलाखत घेतली. एका प्रश्नाला देवेंद्र फडणवीस यांनी चक्क ‘पण, सध्या मी मूर्ख ठरतोय…’, असे उत्तर दिले. फडणवीस यांच्या या उत्तरामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे.

मी पुन्हा येईन, फडणवीसांच्या वक्तव्यावर टाळ्या आणि शिट्या…‘आजही तुम्हीच महाराष्ट्रचे CM आहेत, असं वाटतं याच कारण काय?’ या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, मला 5 वर्षे मिळाली होती, त्यात माझ्याकडे गमवण्यासारखे काहीही नव्हतं, राजकारणात मी कुणाला संपविण्यासाठी किंवा आकसाने कधीच केले नाही. सकारात्मक काम करत राहिलो म्हणून अशी प्रतिमा निर्माण झाली असेल. त्यानंतर फडणवीस यांनी ‘मी पुन्हा येईन” अशी घोषणा केली. त्यावर सभागृहात टाळ्या आणि शिट्या वाजल्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाआणि टि्वटरवर फाॅलो करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *